Natasa Stankovic Departs From Mumbai With Son: भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्यासह घटस्फोटाच्या अफवांदरम्यान, नताशा स्टॅनकोविक बुधवारी १७ जुलैला सकाळी मुलगा अगस्त्यसह मुंबईबाहेर जाताना दिसली. नताशाने तिची बॅग भरतानाचे फोटोही तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. आता एअरपोर्टवरील तिचे फोटो, व्हीडिओ समोर आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – इंग्लिश क्रिकेटपटूच्या घरावर दोन वेळा हल्ला, शेवटी सोडावे लागले घर; CCTV कॅमेऱ्यात कैद झाला हल्ल्याचा VIDEO

हार्दिक पंड्याही श्रीलंका दौऱ्यातील वनडे मालिकेतून माघार घेत असल्याचे वृत्त समोर आले आहे. तर नताशाही मुंबई सोडून गेल्याने या दोघांमध्ये नेमकं चाललंय तरी काय अशा चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. नताशाने तिच्या इन्स्टाग्रामवर बॅग भरतानाचे फोटो शेअर केले. नताशा मुलगा अगस्त्यसोबत, सर्बियामध्ये तिच्या आई-वडिलांच्या घरी जात असल्याचे जसे तिने इंस्टाग्रामवर टाकलेल्या फोटोवरून कळत आहे. नताशाने तिची बॅग भरतानाचा फोटोवर घराचा इमोजी टाकला आहे. तिने तिच्या कारमधून तिच्या कुत्र्याचा फोटोही पोस्ट केला आहे. त्यानंतर नताशाचा मुंबई विमानतळावरील फोटोही समोर आला आहे. पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या पँटवर जॅकेट घातलं आहे. नताशासह तिचा मुलगा अगस्त्यला सोबत घेऊन जाताना दिसत आहे.

हेही वाचा – VIDEO: “RCB म्हणजे फक्त कोहली, गेल आणि डिव्हिलियर्स…” पार्थिव पटेलचा गौप्यस्फोट, आरसीबीला जेतेपद का पटकावता आलं नाही?

काही दिवसांपूर्वी रेडिटवर नताशा आणि हार्दिकच्या घटस्फोटाच्या अफवा पसरल्या होत्या. या जोडप्याने अद्याप या अफवांवर भाष्य केलेले नाही. नताशा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर क्रिप्टिक पोस्ट शेअर करत असते. टी-२० विश्वचषक २०२४ मधील भारताच्या विजयानंतरही तिने पंड्याचे अभिनंदन केले नाही आणि त्याच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी त्याच्या कुटुंबाने आयोजित केलेल्या पार्टीतही सामील झाली नाही.

हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटांच्या या चर्चा दिवसागणिक खऱ्या असल्याचे चित्र दिसत आहे. आयपीएलपासूनच या दोघांमध्ये सारं काही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरू होत्या आणि आता टी-२० वर्ल्डकपनंतर सारं जग हार्दिकचं कौतुक करत असताना त्याच्या पत्नीने एकही पोस्ट वा फोटो त्याच्यासाठी शेअर केलेला नाही. हार्दिकने २०२० मध्ये दुबईमध्ये नताशाला प्रपोज केले होते, त्यानंतर लॉकडाउनमध्ये दोघांनी लग्न केले होते. त्यानंतर अगस्त्यचा जन्म झाला. या जोडप्याने गेल्या वर्षी उदयपूरमध्ये ख्रिश्चन आणि पारंपारिक हिंदू विधींसह पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Natasa stankovic packs her bag and departs from mumbai with son agastya amid divorce rumors with hardik pandya bdg