Natasa Stankovic shared video about Hardik Pandya and Jasmin Walia dating : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक घटस्फोट घेऊन अधिकृतपणे वेगळे झाले आहेत. दोघांनी घटस्फोटासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. आता हार्दिकचे नाव एका ब्रिटीश गायिकेसोबत जोडले जात आहे. हार्दिक पंड्या आणि जास्मिन वालिया यांच्याबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे आता जे काही युजर्स नताशाला ट्रोल करत होते, ते आता तिची माफी मागत आहेत. दरम्यान, नताशाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने म्हटले आहे की, योग्य वेळ आल्यावर देव सर्व काही ठीक करेल.

खरं तर, नताशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने देवावर विश्वास व्यक्त करत सर्व काही ठीक होईल असे सांगितले. तिने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “योग्य वेळ आल्यावर देव सर्व काही ठीक करेल. आपण स्लो डाऊन होण्याची आवश्यकता आहे. जर आपण असे केले तर देवाला सर्वकाही सुरळीत करण्याची संधी मिळेल आणि यानंतर आपण वेगाने पुढे जाऊ शकू.”

नताशाच्या इन्स्टा स्टोरीवरील व्हिडीओ

नताशा आणि हार्दिकच्या नात्यात बरेच दिवस सर्वकाही ठीक नव्हते. ज्यामुळे हार्दिक पंड्या आयपीएल २०२४ मध्येही खूप अस्वस्थ दिसत होता. त्याचबरोबर नताशा पण त्याचा एकही सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आल्याची दिसली नाही. यानंतर काही दिवसांनी म्हणजेत मागच्या महिन्यात दोघांनी एक निवेदन जारी करु आपण घटस्फोट घेऊन विभक्त होत असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा – Jasmin Walia : कोण आहे जॅस्मिन वालिया? जिचे हार्दिक पंड्याशी जोडलं जातय नाव, पाहा फोटो

हार्दिक पंड्या जास्मिन वालियाला डेट करत असल्याची चर्चा –

नताशा स्टॅनकोविकच्या या व्हिडिओचा हार्दिकशी काही संबंध आहे की नाही याबाबत काहीही सांगता येणार नाही. मात्र, हार्दिक आणि जास्मिन वालिया यांच्या डेटच्या चर्चेने जोर धरला आहे. त्याचबरोबर चाहत्यांनी हार्दिक पंड्याच्या पोस्टवरही कमेंट केल्या आहेत. मात्र हार्दिक किंवा जास्मिनने यावर अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

वास्तविक, हार्दिक पंड्या आणि ब्रिटीश गायिका जास्मिन वालियाला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चा, फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर येऊ लागल्यानंतर सुरु झाल्या आहेत. हार्दिक आणि जास्मिन दोघेही ग्रीसमध्ये एकत्र सुट्टी घालवताना दिसत असल्याची चर्चा चाहते आणि नेटीझन्स करत आहेत. हार्दिक आणि जास्मिनने इन्स्टाग्रामवर एकाच स्विमिंग पूलमधून फोटो शेअर केल्यावर चर्चांना उधाण आले आहे. दोघांनी शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडाओच्या बॅकग्राऊंडला एकच ग्रीक व्हॅली दिसत आहे.

हेही वाचा – Hardik Pandya : हार्दिक पंड्या नताशाशी घटस्फोट झाल्यानंतर ‘या’ गायिकेला करतोय डेट? जाणून घ्या कोण आहे ती?

कोण आहे जास्मिन वालिया?

जास्मिन वालिया ही एक ब्रिटिश गायिका आणि टेलिव्हिजन व्यक्तिमत्व आहे. ती म्युझिक इंडस्ट्री आणि सोशल मीडिया या दोन्ही ठिकाणी लोकप्रिय आहे. एसेक्स, इंग्लंडमध्ये भारतीय वंशाच्या माता-पित्याच्या पोटी जन्मलेल्या जास्मिनने प्रथम ब्रिटीश रिॲलिटी टीव्ही मालिका, द ओन्ली वे इज एसेक्समध्ये झळकल्यानंतर प्रकाशझोतात आली. २०१२ मध्ये एका प्रसिद्ध रिॲलिटी शोमधील अभिनयामुळे तिला मनोरंजन क्षेत्रात खूप नाव आणि प्रसिद्धी मिळाली. तिने बिग बॉस १३ च्या फायनलिस्ट असीम रियाझसोबत २०२२ म्युझिक व्हिडिओ ‘नाइट्स एन फाईट्स’ मध्ये देखील काम केले. त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीचे खूप कौतुक झाले आणि या व्हिडिओला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली.

Story img Loader