Australia vs Pakistan 1st Test: ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ऑफस्पिनर नॅथन लायनने त्याचा प्रतिस्पर्धी भारताच्या रविचंद्रन अश्विनचे ​​कौतुक केले. लायनने त्याच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर अश्विनच्या विधानाबाबतच्या बातमीचा हवाला दिला आहे. लायनने अश्विनला खिलाडूवृत्तीचा संदेश दिला आणि सांगितले की, त्याच्यामध्ये अजून बरेच क्रिकेट शिल्लक आहे.

नॅथन लायनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मला खात्री आहे की या सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या शर्यतीत सर्वोत्तम खेळाडू निवडण्याची स्पर्धा जोरदार सुरु झाली आहे परंतु, आम्हा दोघांमध्ये काही चांगली मैत्री आहे त्यामुळे ही स्पर्धा आमच्यात नाही. अश्विन आणि माझ्यात अजून बरीच वर्षे क्रिकेट शिल्लक आहेत.” कसोटी क्रिकेटमध्ये नॅथन लायन आणि रविचंद्रन अश्विनचा उदय जवळजवळ एकाच वेळेस झाला. त्यांना कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी सर्वोत्तम फिरकीपटू का म्हणतात, हे दोघांनी सिद्ध केलं आहे.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
nathan mcswinney
Ind vs Aus: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने दिली ‘या’ नव्या खेळाडूला संधी; पर्थ कसोटीसाठी केला संघ जाहीर
India wicketkeeper batsman Sanju Samson expressed his feelings about the comeback sport news
अपयशानंतर स्वत:च्याच क्षमतेवर प्रश्न! कर्णधार, प्रशिक्षकांच्या पाठिंब्यामुळे बळ; विक्रमवीर सॅमसनची भावना
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार

लायन आणि अश्विन अनेकवेळा एकमेकांसमोर आले आहेत. अश्विनच्या गोलंदाजीतून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते, असे लायनने म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना नॅथन लायन म्हणाला, “तुम्ही अश्विनकडे बघा. तो जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. मी त्याची कारकीर्द जवळून पाहिली आहे. आम्ही वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवगळ्या खेळपट्टीवर जगभर खेळलो आहोत. मी अश्विनचा खूप आदर करतो. तो त्याच्या गोलंदाजीवर चांगले काम करत आहे.”

ऑफस्पिनर लायन म्हणाला, “मी अश्विनकडून नक्कीच खूप काही शिकलो आहे. तुम्ही कोणाच्याही विरोधात खेळाल त्याच्याकडून तुम्हाला शिकण्याची संधी मिळते. तो भारतीय संघासाठी अजून किती विकेट्स घेतो. हे पाहणे मनोरंजक आहे. आम्ही दोघेही ५०० विकेट्सच्या जवळ आहोत. आम्ही आमची कारकीर्द कुठे संपवतो हे पाहणे देखील महत्त्वाचे असेल. आशा आहे की आमची कारकीर्द संपल्यानंतर आम्ही चांगल्या गप्पा मारू, एकत्र जेवण करू आणि बिअर घेऊ आणि या रेकॉर्डबद्दल बोलू.”

हेही वाचा: AUS vs PAK 1st Test: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान स्टीव्ह स्मिथचे सूचक विधान; म्हणाला, “शाहीन आफ्रिदी हा नेहमीच…”

ऑफस्पिनर नॅथन लायनचे गुरुवारपासून (१४ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात ५०० कसोटी विकेट्स पूर्ण करण्याकडे लक्ष असेल. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी गोलंदाज लियॉनने ४९६ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये ५०० हून अधिक विकेट्स घेणारे दोन ऑस्ट्रेलियन गोलंदाज शेन वॉर्न (७०८) आणि ग्लेन मॅकग्रा (५६३) आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने या सामन्यासाठी दोन उपकर्णधारांची नियुक्ती केली आहे. संघाचा कर्णधार पॅट कमिन्स आहे, तर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅविस हेड यांना उपकर्णधारपद देण्यात आले आहे. लायनने पर्थमधील तीन कसोटी सामन्यांमध्ये २२ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा: IND vs SA: टीम इंडियाच्या विजयात पाऊस ठरू शकतो व्हिलन, कसे असेल जोहान्सबर्गचे हवामान आणि खेळपट्टी? जाणून घ्या

पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

पाकिस्तानचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. उभय संघांमधील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात पाच गडी गमावून ३४६ धावा केल्या होत्या. दिवसाचा खेळ संपेपर्यंत अ‍ॅलेक्स कॅरी १४ धावांसह तर मिचेल मार्श १५ धावांसह क्रीजवर आहे. डेव्हिड वॉर्नरने शेवटची कसोटी मालिका खेळताना पाकिस्तानविरुद्ध पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या कसोटीत शतक झळकावले. तो १६४ धावा करून बाद झाला, त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे २६वे शतक होते.