Australia vs Pakistan 1st Test: ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ऑफस्पिनर नॅथन लायनने त्याचा प्रतिस्पर्धी भारताच्या रविचंद्रन अश्विनचे कौतुक केले. लायनने त्याच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर अश्विनच्या विधानाबाबतच्या बातमीचा हवाला दिला आहे. लायनने अश्विनला खिलाडूवृत्तीचा संदेश दिला आणि सांगितले की, त्याच्यामध्ये अजून बरेच क्रिकेट शिल्लक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नॅथन लायनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मला खात्री आहे की या सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या शर्यतीत सर्वोत्तम खेळाडू निवडण्याची स्पर्धा जोरदार सुरु झाली आहे परंतु, आम्हा दोघांमध्ये काही चांगली मैत्री आहे त्यामुळे ही स्पर्धा आमच्यात नाही. अश्विन आणि माझ्यात अजून बरीच वर्षे क्रिकेट शिल्लक आहेत.” कसोटी क्रिकेटमध्ये नॅथन लायन आणि रविचंद्रन अश्विनचा उदय जवळजवळ एकाच वेळेस झाला. त्यांना कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी सर्वोत्तम फिरकीपटू का म्हणतात, हे दोघांनी सिद्ध केलं आहे.
लायन आणि अश्विन अनेकवेळा एकमेकांसमोर आले आहेत. अश्विनच्या गोलंदाजीतून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते, असे लायनने म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना नॅथन लायन म्हणाला, “तुम्ही अश्विनकडे बघा. तो जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. मी त्याची कारकीर्द जवळून पाहिली आहे. आम्ही वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवगळ्या खेळपट्टीवर जगभर खेळलो आहोत. मी अश्विनचा खूप आदर करतो. तो त्याच्या गोलंदाजीवर चांगले काम करत आहे.”
ऑफस्पिनर लायन म्हणाला, “मी अश्विनकडून नक्कीच खूप काही शिकलो आहे. तुम्ही कोणाच्याही विरोधात खेळाल त्याच्याकडून तुम्हाला शिकण्याची संधी मिळते. तो भारतीय संघासाठी अजून किती विकेट्स घेतो. हे पाहणे मनोरंजक आहे. आम्ही दोघेही ५०० विकेट्सच्या जवळ आहोत. आम्ही आमची कारकीर्द कुठे संपवतो हे पाहणे देखील महत्त्वाचे असेल. आशा आहे की आमची कारकीर्द संपल्यानंतर आम्ही चांगल्या गप्पा मारू, एकत्र जेवण करू आणि बिअर घेऊ आणि या रेकॉर्डबद्दल बोलू.”
ऑफस्पिनर नॅथन लायनचे गुरुवारपासून (१४ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात ५०० कसोटी विकेट्स पूर्ण करण्याकडे लक्ष असेल. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी गोलंदाज लियॉनने ४९६ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये ५०० हून अधिक विकेट्स घेणारे दोन ऑस्ट्रेलियन गोलंदाज शेन वॉर्न (७०८) आणि ग्लेन मॅकग्रा (५६३) आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने या सामन्यासाठी दोन उपकर्णधारांची नियुक्ती केली आहे. संघाचा कर्णधार पॅट कमिन्स आहे, तर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅविस हेड यांना उपकर्णधारपद देण्यात आले आहे. लायनने पर्थमधील तीन कसोटी सामन्यांमध्ये २२ विकेट्स घेतल्या आहेत.
पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत
पाकिस्तानचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. उभय संघांमधील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात पाच गडी गमावून ३४६ धावा केल्या होत्या. दिवसाचा खेळ संपेपर्यंत अॅलेक्स कॅरी १४ धावांसह तर मिचेल मार्श १५ धावांसह क्रीजवर आहे. डेव्हिड वॉर्नरने शेवटची कसोटी मालिका खेळताना पाकिस्तानविरुद्ध पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या कसोटीत शतक झळकावले. तो १६४ धावा करून बाद झाला, त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे २६वे शतक होते.