बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना नागपुरात पार पडला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला.या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने इतिहास रचला आहे. यादरम्यान नॅथन लायनने कसोटी क्रिकेटमध्ये ३० हजार चेंडू फेकण्याचा विक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील केवळ सहावा आणि दुसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला आहे.

त्याच्या रेकॉर्डमधील खास गोष्ट म्हणजे त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत एकही नो बॉल टाकलेला नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत असा एकही गोलंदाज नाही. ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये ३०,००० चेंडू टाकले असतील पण त्यात एकही नो बॉल टाकला नाही. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू फेकण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे.

Virat Kohli chanted om namah shivay Gautam Gambhir listened Hanuman Chalisa
कोहलीने कोणत्या सीरिजमध्ये प्रत्येक चेंडूपूर्वी ओम नम: शिवाय म्हटलं? गंभीरसाठी हनुमान चालिसा कशी ठरली किमयागार?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
IND vs BAN Rohit Sharma on KL Rahul and Sarfaraz Khan ahead 1st Test match
IND vs BAN : केएल राहुल की सर्फराझ खान? रोहित शर्माने केले स्पष्ट; ‘या’ खेळाडूला मिळणार प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी
Pratham Singh Scores Maiden Duleep Trophy Century for India A vs India D Match
Duleep Trophy 2024: शुबमन गिलच्या जागी आलेल्या ३२ वर्षीय बदली खेळाडूने झळकावले दुलीप ट्रॉफीतील पहिले शतक, जाणून घ्या कोण आहे?
Matthew Short 5 Wickets Haul Becomes the First opening batsman from the Full Member nation to take 5 wickets in T20I
ENG vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर फलंदाजाने चेंडूसह घडवला इतिहास, T20I मध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू
Ajit Agarkar to Sent Musheer Khan on Australia Tour with India A Squad Just After 7 Matches Impressed by His Innings
Musheer Khan: मुशीर खानच्या खेळीवर अजित आगरकर फिदा; फक्त ७ सामने खेळूनही जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
Joe root make most test runs at lords cricket ground
Joe root : जो रूटने क्रिकेटच्या पंढरीत केला मोठा पराक्रम! सर्व फलंदाजांना मागे टाकत लॉर्ड्सवर केली खास कामगिरी
Priyansh Arya hitting six consecutive sixes in an over
DPL 2024 : ६,६,६,६,६,६…भारताच्या ‘या’ फलंदाजाने केला युवराजसारखा पराक्रम, विक्रमी शतकासह धावसंख्येचाही विक्रम

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू टाकणारे गोलंदाज –

मुथय्या मुरलीधरन – ४४०३९
अनिल कुंबळे – ४०८५०
शेन वॉर्न – ४०७०५
जेम्स अँडरसन – ३७९०७
स्टुअर्ट ब्रॉड – ३१९८२
नॅथन लियॉन – ३००६४*

हेही वाचा – IND vs AUS: ‘मेरी तरफ क्या दिखा रहा रिव्हू दिखा’, कॅमेरामनच्या कृतीवर रोहित भडकल्याने खेळाडू लागले हसू , पाहा VIDEO

पहिल्या डावात ४०० धावा केल्यानंतर टीम इंडियाला २२३ धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात सातत्याने विकेट गमावल्या. त्यामुळे त्यांचा डाव अवघ्या ९१ धावांवर आटोपला. परिणामी तिसऱ्या दिवशीच संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने ५१ चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद २५ धावा केल्या. त्याचबरोबर भारताकडून आर आश्विनने सर्वाधिक ५ विकेट्स घेत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

हेही वाचा – IND vs AUS 1st Test: वसीम जाफरने उडवली ऑस्ट्रेलिया संघाची खिल्ली, ट्विट करत नव्या पद्धतीने शिकवली ABCD

ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव –

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय ऑस्ट्रेलिया संघाला महागात पडला. त्याचा सर्व संघ ६३.५ षटकांत १७७ गुंडाळला. ऑस्ट्रेलिया संघाकडून मार्नस लाबुशेनने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने ४९ धावा केल्या. अशा पद्धतीने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघातील एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना रवींद्र जडेजाने सर्वाधिक पाच विकेट्स घेत ऑस्ट्रेलिया संघाला सुरुंग लावण्याचे काम केले.