घरच्या वातावरणात खेळण्याचा लाभ घेण्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंना अपयश आले, त्यामुळेच दाजीसाहेब नातू स्मृती-अमानोरा करंडक राष्ट्रीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेतील एकेरीत महाराष्ट्राच्या वाटय़ास निराशाच आली. महाराष्ट्राच्या विनीत कांबळे, निहार प्रधान यांना पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत हार स्वीकारावी लागली. पी.अरुणकुमार (आंध्र प्रदेश) याने महाराष्ट्राच्या शेखर सोनावणे याने पुढे चाल दिली. उत्तरांचलच्या मोहित तिवारी याने कांबळे याचे आव्हान २१-१९, २१-१४ असे संपुष्टात आणले. तामीळनाडूच्या के.शिवकुमार याने निहार प्रधान याला २१-१५, २१-१२ असे पराभूत केले. नचिकेत धायगुडे याला उत्तर प्रदेशच्या मनोज यादव याने चुरशीच्या लढतीनंतर १८-२१, २१-१७, २१-१५ असे पराभूत केले.
पुरुषांच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या अमेय ओक व नरेंद्र पाटील यांनी प्रदीप शेरॉन व तुषारकुमार यांना २१-१४, २१-१४ असे हरविले तर निखिल कोल्हटकर व संकेत शिरभाते यांनी एम.कार्तिक व निशांत मूर्ति (कर्नाटक) यांचे आव्हान २१-१३, २१-१३ असे संपविले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा