Smriti Mandhana Today is the 28th birthday: भारतीय महिला क्रिकेट संघाचे नाव घेताच मिताली राज आणि झुलन गोस्वामी हे नाव डोळ्यासमोर येते, मात्र गेल्या काही वर्षांत हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांनी खेळाच्या मैदानावर आपला ठसा उमटवला आहे. आज १८ जुलै रोजी स्टार फलंदाज स्मृती मानधना तिचा २७वा वाढदिवस साजरा करत आहे. ती भारतीय महिला संघाची उपकर्णधार असून बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत असलेल्या टीम इंडियाचा भाग आहे.

वयाच्या १७ व्या वर्षी केले पदार्पण –

स्मृती मंधाना हिची गणना महिला क्रिकेटमधील बलाढ्य खेळाडूंमध्ये केली जाते. तिने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकून दिले आहेत. स्मृतीने २०१३ साली वयाच्या १७ व्या वर्षी बांगलादेशविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने टीम इंडियासाठी ४ कसोटी, ७८ एकदिवसीय आणि ११९ टी-२० सामने खेळले आहेत. स्मृतीने आतापर्यंत एकूण ६ शतके झळकावली आहेत. २०१७ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आणि भारताला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अंतिम सामन्यात भारताला इंग्लंडविरुद्ध ९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

Smriti Mandhana Century smashes fastest ODI hundred by an Indian woman in 70 balls against Ireland
Smriti Mandhana Century: स्मृती मानधनाचं वादळी शतक! वनडेमध्ये ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय फलंदाज
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Indian Army Day 2025 Wishes in Marathi| Happy Indian Army Day 2025
Indian Army Day 2025 Wishes : लष्कर दिनाच्या द्या भारतीय जवानांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश
Khashaba Jadhav, Olympic , Bronze Medal ,
खाशाबा आज हयात असते तर…
Siddheshwar Yatra Festival
Siddheshwar Yatra : सोलापुरात नंदीध्वजांच्या मिरवणुकीने सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
Aai Ani Baba Retire Hot Aahet artis gave a special surprise to Nivedita Saraf on her birthday
Video: ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेतील कलाकारांनी निवेदिता सराफांना वाढदिवसानिमित्ताने दिलं खास सरप्राइज, पाहा व्हिडीओ
Tuljabhavani Devi procession of goddess carried out on tiger vehicle
शाकंभरी नवरात्र महोत्सव, दुसर्‍या माळेला तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा

नॅशनल क्रश या नावाने प्रसिद्ध –

स्मृती मंधानाचा जन्म १८ जुलै १९९६ रोजी मुंबईत झाला. भावाकडून प्रभावित होऊन तिने क्रिकेटपटू होण्याचा निर्णय घेतला. पदार्पणापासूनच ती भारतीय संघाच्या फलंदाजीतील महत्त्वाचा दुवा बनली. ती राष्ट्रीय क्रश म्हणून ओळखली जाते. ती सध्या कुटुंबासोबत सांगलीत राहते.

सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम –

भारतासाठी सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम स्मृती मंधानाच्या नावावर आहे, तिने २०१९ साली न्यूझीलंडविरुद्ध २४ चेंडूत झंझावाती अर्धशतक ठोकले होते. याआधीही सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम तिच्याच नावावर होता, जेव्हा तिने २५ चेंडूत अर्धशतक केले होते. भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा करणारी मंधाना तिसरी खेळाडू आहे. १००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी तिने केवळ ४९ डाव खेळले.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याच्या बाबतीत स्मृती मानधना दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिने आतापर्यंत २२ अर्धशतके झळकावली आहेत. महिलांच्या टी-२० मध्ये सर्वाधिक २७ अर्धशतके झळकावण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या सुझी बेट्सच्या नावावर आहे.

हेही वाचा – VIDEO: धोनीच्या गॅरेजमधील कार आणि बाईक्सची संख्या पाहून चकीत झाला व्यंकटेश प्रसाद; म्हणाला, ‘हे तर शोरुम…’

आयसीसीकडून मिळाले आहेत हे पुरस्कार –

स्टार फलंदाज स्मृती मंधाना हिने २०१८ आणि २०२१ मध्ये आयसीसी महिला ‘प्लेअर ऑफ द इयर’ पुरस्कार जिंकला. २०१८ मध्ये तिला ‘वनडे प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्कारही मिळाला होता. महिला प्रीमियर लीगमध्ये, आरसीबी संघाने तिला ३.४ कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले. लिलावात ती सर्वात महागडी खेळाडू ठरली होती.

Story img Loader