ब्रिस्टॉलमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाला इंग्लंड विरुद्धचा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश आले. तब्बल सात वर्षानंतर कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या या संघात अनेक नवीन खेळाडूंनी पदार्पण केले होते. पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केलेली भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना चर्चेत आली. तिचा मैदानावरील केस बांधतानाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

या फोटोसह तिला अनेकांनी ‘नॅशनल क्रश’ अशी उपमा दिली. अनेक चाहत्यांनी तिच्या लूक्सची वेगवेगळ्या पद्धतीने प्रशंसा केली आहे.

 

 

 

 

 

 

हेही वाचा – शिमला फिरणाऱ्या महेंद्रसिंह धोनीचा ‘दमदार’ लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

स्नेह राणाची अष्टपैलू कामगिरी आणि शफाली वर्माच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाने ९ बाद ३९६ धावांवर आपला डाव घोषित केला. प्रत्युत्तरादाखल टीम इंडिया पहिल्या डावात २३१ धावांवर बाद झाली. इंग्लंडने भारताला फॉलोऑन दिला. त्यानंतर अखेरच्या दिवशी दुसर्‍या डावात ८ बाद ३४४ धावा करुन भारताने सामना वाचवला. दोन्ही डावात अर्धशतके ठोकणाऱ्या शफालीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.