गुजरात येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची लेक राधिका आवटीला तलवारबाजीत सुवर्णपदक मिळाले. याआधी रुद्रपूर (उत्तराखंड) येथे झालेल्या ३१ व्या वरिष्ठ राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्‍यपद स्पर्धेत फॉइल प्रकारात सुवर्णपदक पटकावून कतार (दोहा) येथील फॉइल ग्रँड प्रीक्‍स स्पर्धेसाठी तसेच ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी तिची निवड झाली होती. हे तिचे सलग चौथे सुवर्णपदक आहे.

सांगलीत असलेल्या राधिका प्रकाश आवटी हिने गुजरातमध्ये गांधीनगर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केरळकडून खेळताना तलवारबाजीत सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रीय स्पर्धेतील हे सलग चौथे सुवर्णपदक ठरले आहे. अकिवाट (ता. शिरोळ) हे राधिकाचे मूळ गाव आहे. तिचे प्राथमिक शिक्षण कुपवाडमधील नवकृष्णा व्हॅली येथे झाले आहे. सध्या ती केरळ येथे ‘साई’ प्रशिक्षण केंद्रात सराव करीत आहे. कसून केलेल्या सरावाच्या जोरावर तिने तलवारबाजी स्पर्धेत मोठी मजल मारली. २०२० साली वरिष्ठ राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्‍यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले होते. तिची ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी निवड झाली होती.

Maharashtra News Live Update in Marathi
Maharashtra News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करताच भाग्यश्री आत्राम यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Sharad Pawar
Sharad Pawar: ‘त्या लोकांचे स्वागत करण्यासाठी आम्ही तयारच आहोत’, राष्ट्रवादीत प्रवेश घेणाऱ्यांबाबत शरद पवारांचे सूचक विधान
Maharashtra News Live Update in Marathi
Maharashtra News : “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा”, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची विधानसभेत गर्जना!
President Draupadi Murmu on Maharashtra tour
राष्ट्रपती मुर्मू आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
Prithviraj Chavan : “महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली, कारण..”, माजी मुख्यमंत्र्यांचा दावा
Maharashtrian Khichdi Recipe In Marathi Tur dal ani Val Khichdi Recipe In Marathi
तूर आणि वालाची मसाला खिचडी; रात्रीच्या जेवणाला १० मिनिटांत बनवा अस्सल महाराष्ट्रीयन बेत
Indias Kajal wins gold in Junior World Wrestling sport news
Junior World Wrestling :भारताच्या काजलला सुवर्णपदक; महाराष्ट्राच्या श्रुतिकाचे रौप्यपदकावर समाधान

हेही वाचा : ICC T20 world cup: टी२० विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला आणखी एक धक्का, मध्यमगती गोलंदाज आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर  

तलवारबाजी ह्या खेळात टोकियो ऑलिम्पिकमध्ये भवानी देवीने उत्तम प्रदर्शन करत देशाला या खेळाची ओळख करून दिली. त्यानंतर महाराष्ट्रातून राधिका आवटीने गेल्या दोन वर्षात चमकदार कामगिरी करत स्वतःला सिद्ध केले. देशभरात तलवारबाजीचे प्रशिक्षण देणाऱ्या मोजक्याच काही संस्था आहेत. यामध्ये थॅलेसरच्या केंद्राचा समावेश होतो. या केंद्राची माहिती मिळाल्यानंतर राधिका आपल्या वडिलांसह या केंद्राच्या निवड चाचणीसाठी गेली. तिची निवड झाल्यानंतर तेथेच राहण्याचा तिने निर्णय घेतला. साईचे प्रशिक्षण केंद्र असल्यामुळे तेथे सगळ्या सुविधा उपलब्ध होत्या.

हेही वाचा :  प्रो-कब्बडी लीग: पहिल्या दिवसाच्या सर्व सामन्यांनंतर, कोणते खेळाडू गुणतालिकेत, चढाई आणि बचावात पुढे आहेत?, जाणून घ्या.. 

ही वाटचाल करताना काही वर्षांपूर्वी, तिने सिंगापूरमधील अंडर-१७ आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भाग घेत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर तिने मागे वळून पहिलेच नाही. परंतु पुढच्याच वर्षी झालेल्या स्पर्धेत फॉइल टीमकडून कांस्यपदक जिंकले. तेव्हापासून ती कधीही राष्ट्रीय स्पर्धांमधून रिकाम्या हाताने परतली नाही.