सायकलिंगचा वसा घरातूनच मिळालेल्या पुणेकर ऋतुजा सातपुतेने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. २८ किलोमीटर वैयक्तिक वेळ चाचणी शर्यतीत ऋतुजाने अव्वल स्थान पटकावले. तिने ही शर्यत ४६ मिनिटे, ४९ सेकंदांत पूर्ण केली. केरळच्या कृष्णेंदू टी. कृष्णाला दोन सेकंदांनी मागे टाकत ऋतुजाने हे यश मिळवले. केरळच्याच महिता मोहनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
पुरुषांमध्ये ३६ किमी वैयक्तिक निवड चाचणी सायकल शर्यतीत महाराष्ट्राच्या अरविंद पनवरने रौप्यपदक मिळवले. कर्नाटकच्या नवीन थॉमसने सुवर्णपदकावर कब्जा केला. अवघ्या २० सेकंदांच्या फरकाने अरविंदने सुवर्णपदक हुकले. अरविंदने ही शर्यत ५० मिनिटे व २८ सेंकंदात पूर्ण केली.
सोलापूर जवळच्या बार्शीच्या प्रार्थना ठोंबरेने टेनिस एकेरीत रौप्यपदकावर नाव कोरले. गुजरातच्या अंकिता रैनाने प्रार्थनावर ७-५, ६-३ अशी मात करत सुवर्णपदक पटकावले.
प्रार्थनाचे या स्पर्धेतले हे तिसरे पदक आहे. प्रार्थनाने महिला सांघिक प्रकारात आणि महिला दुहेरीत कांस्यपदकावर मिळवले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा