नाशिकची उदयोन्मुख धावपटू संजीवनी जाधवने चेन्नई येथे आयोजित १५ व्या फेडरेशन चषक कनिष्ठ अॅथलेटिक्स स्पर्धेत पुन्हा एका नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद करत दुसरे सुवर्ण पटकाविले. संजीवनीच्या या यशाने नाशिकची अॅथलेटिक्स क्षेत्रातील चमक नव्याने दिसून आली आहे.
संजीवनीने चेन्नई येथील स्पर्धेत पाच हजार मीटरनंतर तीन हजार मीटर धावण्यातही नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. पाच हजार मीटरचे अंतर १७:११:२७ या वेळेत पूर्ण करून पश्चिम बंगालच्या सहारा खातीमचा (१८:१७:३०) विक्रम तिने मोडला. त्यानंतर तीन हजार मीटर अंतर ९:४७ वेळेत कापून पुन्हा एका नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. याआधीचा विक्रमही खातीमच्याच नावावर होता. २०११ मध्ये तिने १०:०२ अशी वेळ नोंदवली होती. संजीवनी ही भोसला सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहे.
धावपटू संजीवनी जाधवचे राष्ट्रीय विक्रमांसह दोन सुवर्ण
नाशिकची उदयोन्मुख धावपटू संजीवनी जाधवने चेन्नई येथे आयोजित १५ व्या फेडरेशन चषक कनिष्ठ अॅथलेटिक्स स्पर्धेत पुन्हा एका नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद करत दुसरे सुवर्ण पटकाविले. संजीवनीच्या या यशाने नाशिकची अॅथलेटिक्स क्षेत्रातील चमक नव्याने दिसून आली आहे.
First published on: 12-05-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National records of runner sanjivani jadhav in federation competition