भारताची आघाडीची पॅरालिम्पिकपटू दिपा मलिकचा खेलरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाचं औचित्य साधून राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिपाचा सत्कार केला. राष्ट्रपती भवनात या दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. हा सन्मान मिळवणारी दिपा पहिला पॅरालिम्पीकपटू ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१६ साली रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत दिपाने रौप्यपदकाची कमाई केली होती. दिपा मलिकसोबत कुस्तीपटू बजरंग पुनियालाही खेलरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. मात्र बजरंग सध्या रशियामध्ये आगामी जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी तयारी करतो आहे. या कारणासाठी तो या सोहळ्याला हजर राहू शकला नाही. यावेळी बोलत असताना दिपाने आपल्याला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला. माझ्या या कामगिरीमुळे देशात पॅरालिम्पिकपटूंकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलेल अशी मला आशा आहे.