डेहराडून : देशात उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याबरोबर मंगळवारी येथील उत्तराखंडमध्ये देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय क्रीडा संस्कृतीचे प्रदर्शन करणाऱ्या कुंभमेळ्याला शानदार सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धेच्या उद्घाटन करताना मैदानात उपस्थित युवा खेळाडूंबरोबर देशातील सर्व युवकांना तंदुरुस्त भारत घडविण्याचे भावनिक आवाहन केले.

‘‘देशातील नागरिकांमध्ये स्थूलपणा मोठ्या प्रमाणात पसरत आहे. प्रत्येक वयातील व्यक्तीला या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे मधुमेह, हृदयविकार असे आजार बळावत आहेत. अशा वेळी तंदुरुस्तीचे महत्त्व समजणे गरजेचे आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांतून तंदुरुस्ती आणि जीवनाचा समतोल यांचा संदेश युवकांना मिळत आहे. त्यामुळे भविष्यात शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू नये यासाठी तंदुरुस्त भारत घडवा,’’ असे आवाहन मोदी यांनी या वेळी दिले. उद्घाटन सोहळ्यातच मोदी यांनी उत्तराखंड सरकारने आपल्या विकासाचे मार्ग शोधण्याची गरज असून, केवळ चारधाम यात्रेवर अवलंबून राहून चालणार नाही. थंड हवामानातील पर्यटनाला कशी चालना मिळेल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही सांगितले. त्याच वेळी समान नागरी कायदा लागू करून उत्तराखंड सरकारने ऐतिहासिक कामगिरी केल्याचे राजकीय भाष्यही मोदी यांनी केले. घटनेतील मूळ भावना या वेळी भक्कम होईल असे सांगून मोदी यांनी खेळ भावना आपल्याला अशा भेदभावापासून दूर ठेवू शकेल. समान नागरी कायद्यातून कसलाच भेदभाव केला जाणार नाही, असेही मोदी म्हणाले.

Like Congress BJP in district faces factionalism highlighted during Guardian Minister Ashok Uikes first tour
पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात भाजपमधील गटबाजी उघड
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Loksatta chawadi Ahilyanagar uday samant State Environment Minister Shambhuraj Desai Satara
चावडी: योग्य वेळी योग्य भूमिका
Implementation of Uniform Civil Code UCC begins in Uttarakhand
समान नागरी कायद्याचे राज्य; भाजपच्या आश्वासनपूर्तीची उत्तराखंडमधून सुरुवात
BJP boycotts visit of Buldhana Guardian Minister and Rehabilitation Minister Makarand Patil
बुलढाणा : पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावर भाजपचा बहिष्कार! युतीत विसंवाद
grihitha vichare kedarkantha loksatta news
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने १० वर्षाच्या ग्रिहीथाने उत्तराखंडाच्या केदारकंठावर फडकविला प्रतिकात्मक राष्ट्रध्वज
municipal administration removed welcome sign reappeared after the protest
स्वागताचा हटवलेला फलक आंदोलनानंतर पुन्हा झळकला
Construction of large water channels begins in Gorai Mumbai news
गोराईमध्ये मोठ्या जलवाहिन्या टाकण्यास सुरुवात; काही गावांमध्ये पालिकेच्या कामाला विरोध

राजकीय टिप्पणी होत असतानाच मोदी यांनी पुन्हा एकदा खेळावर लक्ष केंद्रित करताना २०३६ मधील ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठी केंद्र सरकार पूर्ण प्रयत्न करत असल्याचेही सांगितले. ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजे केवळ खेळाचे आयोजन नाही, तर यातून नवनिर्मिती, पर्यटन, उद्याोग-व्यवसाय अशा विविध आघाड्यांवर देशाचा आणि पर्यायाने यजमान शहराचा विकास होतो, असे मोदी यांनी सांगितले.

असा झाला उद्घाटन सोहळा

●बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने क्रीडा ज्योत तेजस्विनी मशाल पंतप्रधान मोदींकडे सोपवली

●शंखनादाने उद्घाटन सोहळ्यास सुरुवात, शिवतांडव नृत्याने मने जिंकली

●उत्तराखंडची परंपरा दर्शविताना आकर्षक लेसर शो

●उद्घाटन सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदींचा जसपाल राणा, मनीषा रावत, लक्ष्य सेनसह ११ खेळाडूंशी संवाद

●पांडवाज समूहाच्या बँड सादरीकरणात १२०० शाळकरी मुलांचा सहभाग

●मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्यासह क्रीडामंत्री रेखा आर्या, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, उत्तराखंडचे राज्यपाल गुरमित सिंग, ‘आयओए’ अध्यक्षा पी.टी. उषा, राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे अध्यक्ष ख्रिास जेनकिन्स यांची उपस्थिती

●४५० सुवर्ण, रौप्य, कांस्यपदकांचा होणार निर्णय. महाराष्ट्राच्या २० खेळाडूंचा संचलनात सहभाग, प्रतीक वाईकर, आदिती स्वामी ध्वजवाहक

Story img Loader