National Sports Day 2024: २९ ऑगस्ट हा दिवस देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांनी ऑलिम्पिकपासून अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये देशाला हॉकीमध्ये विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मेजर ध्यानचंद यांचे क्रीडा क्षेत्रातील समर्पण आणि योगदान लक्षात घेऊन आजचा दिवस देशात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून घोषित करण्यात आला.

हेही वाचा – Sachin Tendulkar: “आचरेकर सरांच्या कर्मभूमीत…” शिवाजी पार्कमध्ये होणार सचिन तेंडुलकरच्या गुरूंचे स्मारक, मास्टर ब्लास्टरने शेअर केली भावुक पोस्ट

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Champions Trophy Tour Updates PoK cities removed from ICC global Trophy Tour
Champions Trophy : भारतापुढे पाकिस्तानने घेतलं नमतं, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नव्या टूरमधून POK वगळलं
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
Border Gavaskar Trophy 2024 Ind vs AUS Schedule in Marathi
Border Gavaskar Trophy 2024 Schedule: भारतीय वेळेनुसार बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं कसं असणार वेळापत्रक? पहाटे किती वाजता सुरू होणार सामना?
Childrens day 2024 | childhood days never come back
Children’s day 2024 : बालपणीचे दिवस परत कधीही येत नाही! VIDEO पाहून आठवेल तुम्हाला तुमचे बालपण
singles day in china
11/11: याच दिवशी का साजरा केला जातो ‘सिंगल्स डे’?

हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी झाला आणि त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून घोषित करण्यात आला. हॉकीमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देण्यात त्यांनी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली आणि आपल्या कारकिर्दीत ५०० हून अधिक गोल केले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देशाचे राष्ट्रपती क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या खेळाडूंचा गौरव करतात. खेलरत्न पुरस्काराला आता अधिकृतपणे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हटले जाते.

हेही वाचा – Paris 2024 Paralympics: पहिली भारतीय टेबल टेनिस पदक विजेती, पॅरालिम्पिक नेमबाज चॅम्पियन, वर्ल्ड रेकॉर्ड करणारा भालाफेकपटू… ‘हे’ आहेत पॅरालिम्पिक स्पर्धेत संभाव्य पदकविजेते

National Sports Day 2024: राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व

राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यामागचा उद्देश देशातील जनतेला खेळाचे महत्त्व आणि खेळाडूंच्या योगदानाची जाणीव करून देणे आणि खेळांना प्रोत्साहन देणे हा आहे. खेळामुळे लोक केवळ शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहत नाहीत तर देशात एकता आणि बंधुता वाढीस लागते.

National Sports Day 2024: कोण आहेत मेजर ध्यानचंद?

मेजर ध्यानचंद यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ साली झाला. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात ते एक प्रमुख हॉकीपटू होते. १९२८, १९३२आणि १९३६ उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये भारताच्या ऑलिम्पिक सुवर्णपदकांची पहिली हॅटट्रिक करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सिंग यांनी आपल्या हॉकी कारकीर्दीची सुरुवात ब्रिटीश इंडियन आर्मी रेजिमेंटल संघातून केली, जिथे त्यांनी रात्रीच्या वेळेत सराव केला आणि १९२८च्या ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघासाठी त्यांना बोलावण्यात आले.

हेही वाचा – Ravindra Jadeja Wife: रवींद्र जडेजाची आमदार पत्नी कंबरेभर पाण्यात उतरून करतेय लोकांची मदत, जडेजाच्या कमेंटनेही वेधलं लक्ष, पाहा VIDEO

हॉकी खेळाची समज आणि त्यांची कामगिरी पाहता त्यांना हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाऊ लागले. १९२६ ते १९४८ या त्यांच्या हॉकी कारकिर्दीत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सर्वकाळातील महान हॉकी खेळाडूंपैकी एक ठरले. १९५६ मध्ये भारतीय सैन्याच्या पंजाब रेजिमेंटमध्ये मेजर म्हणून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांना पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला. याव्यतिरिक्त, त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा सन्मान करण्यासाठी, २०१२ मध्ये भारत सरकारने त्यांची जयंती दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला.

National Sports Day 2024: महत्त्व आणि उत्सव

मेजर ध्यानचंद यांचा वारसा खेळाडूंना प्रेरणा देत आला आहे आणि राष्ट्रीय क्रीडा दिन खेळातील शिस्त, संघ आणि राष्ट्रीय अभिमान वाढवण्यासाठी खेळांच्या महत्त्वाची आठवण करून देतो. २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेलो इंडिया ही स्कीम या दिवशीच जाहीर केली होती. राष्ट्रीय क्रीडा दिनी भारतीय खेळाडूंच्या कर्तृत्वाचा गौरव केला जातो. भारताचे राष्ट्रपती यादिवशी प्रतिष्ठित क्रीडा पुरस्कार प्रदान करतात, त्यापैकी एक मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, हा देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे.