सेंट अ‍ॅन्स प्रशाला (तळवडे) यांच्यातर्फे १८ ऑगस्ट रोजी राज्यस्तरावर जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये आठशे खेळाडू सहभागी होतील अशी अपेक्षा आहे
ही स्पर्धा शिवछत्रपती क्रीडानगरीत होणार आहे. स्पर्धेकरिता पुरुष, महिला, ६, ८, १०, १२, १४, १६ वर्षांखालील मुले व मुली असे गट ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेतील सवरेत्कृष्ट पुरुष व महिला खेळाडूस पंधराशे रुपयांचे बक्षीस दिले जाईल. निवडक सहा खेळाडूंना दरमहा दोनशे रुपयांची शिष्यवृत्ती वर्षभरासाठी दिली जाणार आहे. या स्पर्धेत पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आदी ठिकाणचे खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळांडूंनी रमेश विपट (९८६००४०८४०)  यांच्याकडे संपर्क साधावा.  ही स्पर्धा राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने होणार आहे.