Naveen Ul Haq Retirement: अफगाणिस्तानचा युवा क्रिकेटर नवीन-उल-हकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. नवीनने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितले की, “तो २०२३च्या विश्वचषक स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.” वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी निवृत्तीचा निर्णय घेऊन नवीनने सर्वांनाच चकित केले आहे. त्याने त्याच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, “तो एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. मात्र टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अफगाणिस्तानकडून खेळत राहीन. नवीन आयपीएल २०२३ दरम्यान विराट कोहलीशी संघर्ष करून तो प्रसिद्धीझोतात आला होता.

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू नवीन-उल-हकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. नवीनने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. नवीनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “भारतात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर मी ५० षटकांच्या क्रिकेटला अलविदा करणार आहे. मात्र, तो अफगाणिस्तानकडून टी-२० फॉरमॅटमध्ये खेळत राहणार आहे.” २४ वर्षीय नवीनने अफगाणिस्तानसाठी केवळ ७ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने १४ विकेट्स घेतल्या आहेत.

siddharth shukla shehnaz gill
शहनाज गिलने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासाठी शेअर केली पोस्ट, ते दोन आकडे अन् चाहते म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
Free Aadhaar update details in marathi
Free Aadhaar update: उरला फक्त शेवटचा १ दिवस, आधारकार्डशी संबंधित ‘हे’ काम पटापट करा, अन्यथा…;
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
Venkatesh Iyer Completed His MBA and Now Pursuing PhD in Finance
IPL 2025: आयपीएल लिलावात २३ कोटींपेक्षा जास्त बोली अन् आता होणार डॉक्टर, कोण आहे हा खेळाडू?
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
Aishwarya Narkar Birthday
५० वर्षांच्या झाल्या ऐश्वर्या नारकर! ‘असा’ साजरा केला वाढदिवस; व्हिडीओत दाखवली संपूर्ण झलक, म्हणाल्या…

बुधवारी संध्याकाळी नवीनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीबद्दल सांगितले. नवीनने लिहिले की, “माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. या विश्वचषकानंतर मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेईन. मात्र, मी माझ्या देशासाठी टी२० क्रिकेट खेळत राहीन. हा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे नाही, पण माझी क्रीडा कारकीर्द लांबणीवर टाकण्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला. मी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे आभार मानू इच्छितो आणि माझ्या सर्व चाहत्यांचे समर्थन आणि अतूट प्रेमाबद्दल देखील त्यांचे आभार मानतो.”

नवीन अवघ्या २४ वर्षांचा असून त्याने अफगाणिस्तानसाठी ७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत १४ विकेट्स घेतल्या आहेत. नवीनची वन डेतील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे एका सामन्यात ४२ धावांत ४ विकेट्स घेणे. त्याने २७ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ८ आयपीएल सामन्यात ११ विकेट्स घेतल्या आहेत. नवीन हा लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू आहे. आयपीएलच्या मागील आवृत्तीत विराट कोहलीसोबत झालेल्या संघर्षामुळे तो खूप लोकप्रिय झाला होता.

हेही वाचा: World Cup 2023: बांगलादेश क्रिकेटमध्ये नवे संकट! शाकिब-अल-हसनची बोर्डाकडे अजब मागणी; म्हणाला, “तमीम इक्बालला निवडले तर…

विराट कोहलीसोबतच्या लढतीनंतर नवीन प्रसिद्धीझोतात आला

नवीन-उल-हक यावर्षी इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये विराट कोहलीसोबतच्या लढतीमुळे प्रकाशझोतात आला. नवीन-उल-हक हा आयपीएलमध्ये के.एल. राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्स संघाचा एक भाग आहे. आयपीएल २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीविरुद्ध त्याचे भांडण झाले, त्यानंतर तो बराच चर्चेत राहिला.

Story img Loader