ZIM vs AFG Naveen Ul Haq 13 Ball Over: झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला गेला. हा सामना जिंकून झिम्बाब्वे संघाने मालिकेला विजयाने सुरुवात केली. हा कमी धावसंख्येचा सामना होता ज्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला. पण या सामन्यात १३ चेंडूंचे एक षटक पाहायला मिळाले. अफगाणिस्तानच्या नवीन उल हकने त्याचे षटक पूर्ण करण्यासाठी १३ चेंडू टाकावे लागले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हकसाठी हा सामना फार वाईटच ठरला. नवीन उल हक हा अफगाणिस्तानचा टी-२० फॉरमॅटमधील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज आहे, पण झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यातील त्याची कामगिरी फारच निराशाजनक होती, नवीन उल हकने झिम्बाब्वेच्या डावातील १५वे षटक टाकले. या षटकात ६ लीगल चेंडू टाकण्यासाठी त्याला १३ चेंडू टाकावे लागले. यादरम्यान नवीन उल हकने ६ वाईड बॉल आणि १ नो बॉल टाकला, ज्यामुळे त्याने या षटकात एकूण १९ धावा खर्च केल्या.

हेही वाचा – IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?

नवीन उल हकने षटकाची सुरुवात वाईडने केली आणि नंतर षटकाच्या पहिल्या कायदेशीर चेंडूवर १ धाव दिली. यानंतर नवीनने दुसरा चेंडू नो बॉल टाकला, ज्यावर चौकारही आला. पण फ्री हिट बॉल टाकण्यापूर्वी त्याने सलग ४ वाईड बॉल टाकले. यानंतर फ्री हिटवरही चौकार लागला. मात्र, टकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याला यश मिळाले. यानंतरही तो योग्य लाइन आणि लेन्थमध्ये गोलंदाजी करू शकला नाही. पुढच्या दोन चेंडूंवर त्याने २ धावा दिल्या, पण पुन्हा एकदा वाईड बॉल टाकला, यानंतर तो षटकाचा शेवटचा कायदेशीर चेंडू टाकण्यात यशस्वी झाला, ज्यावर १ धाव दिली. अशारितीने त्याने एक षटक पूर्ण करण्यासाठी १३ चेंडू टाकले.

हेही वाचा – IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?

हेही वाचा – SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

अफगाणिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांना मोठी धावसंख्या धावफलकावर लावता आली नाही. अफगाणिस्तानचा संघ २० षटकांत ६ गडी गमावून केवळ १४४ धावा करू शकला. त्याचवेळी, झिम्बाब्वेसाठीही हे धावांचे आव्हान सोपे नव्हते, त्यांनी सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर १ धाव घेत विजय मिळवला. तर नवीन उल हकने एका खराब षटकाव्यतिरिक्त चांगली गोलंदाजी करत ४ षटकांत ३३ धावा देत ३ विकेट घेतले. पण तेच एक षटक त्यांच्या पराभवाचे कारण ठरले, अन्यथा निकाल वेगळा असू शकला असता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naveen ul haq bowls a 13 ball over including 6 wides 1 no ball in afg vs zim 1st t20i match watch video bdg