Naveen Ul Haq Teased with Virat Kohli video : आयपीएल २०२३ मध्ये विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात मोठा वाद पाहायला मिळाला होता. ज्यामुळे विराट आणि गंभीर यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले होते. यानंतर बरीच महिने क्रिकेट विश्वात या वादाची चर्चा सुरु होती. त्यावेळी विराट कोहलीच्या चाहत्यांनी नवीन आणि गंभीर यांना प्रचंड ट्रोल केले होते. ज्यानंतर विराट-गंभीर आणि नवीन उल हकने वाद मिटवून घेतल्याने चर्चा थांबली आहे. मात्र, नवीन उल हकने आता विराट कोहली बाबतच्या एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवीन उल हकचा व्हिडिओ व्हायरल –

विराट कोहलीबरोबर झालेल्या वादानंतर नवीन उल हकला सर्वात जास्त ट्रोल करण्यात आले होते, ज्यामुळे त्याने त्यावेळी त्याच्या इन्स्टाग्रामवरील कमेंट्स बंद केल्या होत्या. पण आता हे प्रकरण मिटले आहे, नवीन उल हकचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो विराट कोहलीच्या रिल्स पाहून कंटाळला असल्याचे दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये नवीन उल हक इन्स्टाग्रामवर रील पाहत होता. पण विराट कोहली व्यतिरिक्त त्यात काही वेगळा कंटेंट दिसला नाही. यानंतर नवीन उल हक वैतागला आणि त्यांनी फोन बंद केला. यानंतर नवीनने टीव्ही ऑन करण्याचा प्रयत्न केला. या मजेशीर व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

एकदिवसीय विश्वचषकात मिटला वाद –

एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना झाला होता. त्यानंतर प्रेक्षकांनी पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या अष्टपैलू खेळाडूला लक्ष्य केले. यावेळी विराट कोहलीने पुढाकार घेत चाहत्यांना शांत केले. त्याचबरोबर नवीन उल हकशी हस्तांदोलन करत लाइव्ह सामन्यात त्याला मिठी मारली. अशा प्रकारे आयपीएल २०२३ पासून सुरु झालेला वाद संपुष्टात आला.

हेही वाचा – Test Rankings : ICC ची ताजी कसोटी क्रमवारी जाहीर! यशस्वी जैस्वालला फायदा तर बाबर आझमला बसला मोठा फटका

गंभीरनेही विराटला मारली मिठी –

आयपीएल २०२४ मध्ये जेव्हा विराट आणि गंभीरचे संघ आमनेसामने आले, तेव्हा मागील वादांच्या चर्चांना उधाण आले. त्यानंतर विराट आणि गंभीर दोघांनीही हा मुद्दा फक्त चाहत्यांचा मुद्दा असल्याचे म्हटले. आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामन्यादरम्यान गंभीरने विराट कोहलीची भेट घेतली आणि त्याला मिठी मारली आणि संवादही साधला. ज्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. आता गंभीर हा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असून त्याचे विराट कोहलीसोबतचे मस्तीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naveen ul haq teased with virat kohli video in instagram at barbados during caribbean premier league 2024 vbm