विंहग स्पोर्ट्स (ठाणे) व नवमहाराष्ट्र संघ (पुणे) यांच्यात महापौर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लढत होणार आहे.
या स्पर्धेत विहंग संघाने सह्य़ाद्री संघावर १६-११ (पूर्वार्ध ८-५) अशी सहज मात केली. विजयी संघाकडून मनोज पवार (२ मि, १ मि.५० सेकंद व २ गडी) व सचिन पालकर (१ मि.५० सेकंद, दीड मिनिटे व एक गडी) यांनी अष्टपैलू खेळ केला. पराभूत संघाकडून सिद्धेश कदम (१ मि.१० सेकंद, १ मि.५० सेकंद व २ गडी), प्रणय राउळ (दोन्ही डावात प्रत्येकी दीड मिनिटे) यांची लढत अपुरी ठरली.
नवमहाराष्ट्र संघाने महात्मा गांधी स्पोर्ट्सला १५-१४ असे एक गुण व तीन मिनिटे ४० सेकंद राखून हरविले. त्याचे श्रेय प्रतिक वाईकर (२मि.२० सेकंद, २ मि.१० सेकंद व तीन गडी), कुणाल वाईकर (दोन्ही डावांत प्रत्येकी दीड मिनिटे), मुकेश गोसावी (४ गडी), शंतनु इनामदार (३ गडी) यांना द्यावे लागेल. पराभूत संघाच्या दीपेश मोरे (२ मि.५० सेकंद) व राहुल साळुंके (५ गडी) यांनी दिलेली लढत अपुरी होती.
अंतिम सामना रविवारी सायंकाळी सहा वाजता सुरू होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा