शरद पवार हे नाव राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात मोठ्या आदराने घेतलं जातं. राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये शदर पवारांनी प्रत्येक पदं भूषवलं आहे. आमदार, खासदार, राज्याचा मुख्यमंत्री, केंद्रीय कॅबिनेट मंत्री, बीसीसीआय आणि आयसीसी अध्यक्ष अशी अनेक महत्वाची पदं पवारांनी आतापर्यंत भूषवली आहे. मात्र पंतप्रधानपदाने पवारांना आतापर्यंत नेहमी हुलकावणी दिली आहे. सध्या देशात भाजप सरकार असलं तरीही पवारांची पंतप्रधान बनण्याची इच्छा अजुनही लपून राहत नाही. नुकतचं पाकिस्तानमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत माजी क्रिकेटपटू इम्रान खान पंतप्रधानपदावर विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. आज कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत पंतप्रधानपदावरुन प्रश्न विचारला असता पवारांनी मिष्कीलपणे, विराट कोहलीचा या पदासाठी विचार करावा लागेल असं उत्तर देत हशा पिकवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतर क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष या नात्याने तुम्हाला पंतप्रधान होण्यासाठी आवडेल का असा प्रश्न विचारला असता पवारांनी, “लोकसभा निवडणुका आता जवळ येत आहेत, पाहूया काय होतंय. भारतात या पदासाठी कदाचित विराट कोहलीचा विचार करावा लागेल”, असं उत्तर दिलं. देशाचा आणि जागतिक क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष या नात्याने इम्रान खानशी आपले संबंध आले आहेत, मात्र राजकारणी म्हणून मी इम्रान खानला कधीही भेटलो नसल्याचंही पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटना दुरूस्ती करणे शक्य आहे. घटना दुरूस्ती करण्याचा निर्णय जर केंद्र सरकारने घेतला तर विरोधकांना त्याची गरज मी समजावून सांगेन अशी भूमिका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतली आहे. घटना दुरूस्ती केली तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते असेही त्यांनी म्हटले आहे. कोल्हापुरातील दसरा चौकात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला शरद पवारांनी हजेरी लावली आहे. त्याआधी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका घेतली आहे.