Ned Leonard Strange Dismissal by Ben Cliff Video Viral : जेव्हा एखादा मित्र तुम्हाला साथ देत नाही तेव्हा एकच गाणे मनात येते, ते म्हणजे “दोस्त दोस्त ना रहा…” असेच दृश्य क्रिकेटच्या खेळपट्टीवरही पाहायला मिळाले. जिथे एक फलंदाज त्याचा नॉन-स्ट्रायईकर फलंदाजामुळे आऊट व्हावे लागले. ही घटना इंग्लंडच्या द्वितीय श्रेणी टी-२० फायनलमध्ये घडली. सॉमरसेट आणि यॉर्कशायर यांच्यात वर्म्सले येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात यॉर्कशायरचा वेगवान गोलंदाज बेन क्लिफने सॉमरसेटचा फलंदाज नेड लिओनार्डला अनोख्या पद्धतीने बाद केले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वास्तविक, सॉमरसेटच्या डावाचे १९ वे षटक सुरू होते. नेड लिओनार्ड स्ट्राइकवर होता आणि त्याला बेन क्लिफ गोलंदाजी करत होता. यावेळी बेन क्लिफने टाकलेल्या चेंडूवर नेड लिओनार्डने सरळ शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू सहकारी नॉन-स्ट्राईक फलंदाज अल्फी ओगबॉर्नच्या खांद्यावर लागला. त्यामुळे चेंडूची दिशा बदलली आणि तो थेट गोलंदाज बेन क्लिफच्या दिशेने गेलाबेन क्लिफने शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर लक्ष ठेवले आणि हा सोपा झेल घेतला.

Sanju Samsons six hits fan
Ind vs SA: संजू सॅमसनच्या षटकाराने चाहती घायाळ
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार
Alzarri Joseph Got Angry on West Indies Captain Shai Hope on Field Setting and Leaves the Ground in Live Match of WI vs ENG Watch Video
Video: अल्झारी जोसेफ कर्णधारावरच भडकला, रागाच्या भरात थेट गेला मैदानाबाहेर, १० खेळाडूंसह खेळण्याची वेस्ट इंडिजवर ओढवली वेळ

झेल घेतल्यानंतर अल्फीने लिओनार्डशी हात जोडून खेद व्यक्त केला. या विचित्र आऊटचा व्हिडीओ यॉर्कशायर वायकिंग्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. बेन क्लिफने फायनलमध्ये शानदार गोलंदाजी केली, त्याने ७.५० च्या इकॉनॉमीने चार षटकात केवळ ३० धावा दिल्या आणि तीन विकेट्स घेतल्या. बेन क्लिफने संपूर्ण हंगामात सहा सामन्यांत एकूण सात विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा – Paris Olympics 2024: ॲथलेटिक्समध्ये पहिले पदक तर हॉकीमध्ये सुवर्णपदक, जाणून घ्या ऑलिम्पिकमध्ये कसा आहे भारताचा इतिहास?

सॉमरसेटने यॉर्कशायर ६६ धावांनी विजय मिळवला –

या फायनल सामन्यात सॉमरसेटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात जेएफ थॉमसने २७ चेंडूत ५२ धावा केल्या. ज्यामध्ये ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. २० षटकांत १९१ धावा करून उर्वरित संघ सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात यॉर्कशायरसाठी केवळ विल लक्सटनला ३० धावांचा आकडा पार करता आला. यॉर्कशायर संपूर्ण संघ १६.५ षटकात १२५ धावा करून ऑलआऊट झाला. ज्यामुळे सॉमरसेटने हा सामना ६६ धावांनी जिंकला.