Netherland vs Afghanistan ICC Cricket World Cup 2023 Match Updates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील ३४वा सामना आज नेदरलँड आणि अफगाणिस्तान यांच्यात होत आहे. हा सामना लखनऊच्या एकाना स्टेडियमवर खेळवला जात आहे. हे दोन्ही संघ पहिल्यांदाच विश्वचषकात आमनेसामने आले आहेत. अफगाणिस्तानने स्पर्धेतील ६ पैकी ३ सामने जिंकले आहेत, तर नेदरलँडने ६ पैकी २ सामने जिंकले आहेत. आजच्या सामन्यात नेदरलँड्सने अफगाणिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने अफगाणिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकली. त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या विकेटवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा वरचष्मा असतो. एडवर्ड्सने संघात एक बदल केला आहे. सलामीवीर विक्रमजीत सिंगच्या जागी वेस्ली बॅरेसीचा संघात समावेश करण्यात आला आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीनेही एक बदल केला. नवीन उल हकच्या जागी नूर अहमदला संधी मिळाली आहे.

Womens T20 World Cup 2024 Pak W vs Sri W match highlights in Marathi
Womens T20 WC 2024 : श्रीलंका-पाक सामन्यात रुमाल पडल्याने फलंदाजाला मिळाले जीवदान, नेमकं कारण काय? जाणून घ्या
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
IND vs BAN 2nd Test Match Updates in Marathi
IND vs BAN : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत केला नवा विश्वविक्रम, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच संघ
SA vs IRE 2nd T20 Highlights in Marathi
SA vs IRE 2nd T20 : आयर्लंडचा ऐतिहासिक विजय! प्रथमच बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा १० धावांनी उडवला धुव्वा
WTC Points Table Sri Lanka Beat New Zealand and Improve PCT on 3rd Spot
WTC Points Table: श्रीलंकेमुळे ऑस्ट्रेलियाचा WTC अंतिम फेरीचा मार्ग खडतर; कसोटी मालिकेत न्यूझीलंड संघावर मिळवला एकतर्फी विजय
Cameron Green Doubtful For Border-Gavaskar Trophy After Sustaining Back Injury In England ODIs
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ‘या’ स्टार अष्टपैलू खेळाडूला झाली दुखापत
IND vs BAN 1st Test Day 1st Updates in Marathi
IND vs BAN 1st Test : बांगलादेशचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
Bangladesh Captain Big Statement Ahead of IND vs BAN test Series
IND vs BAN: “ते क्रमवारीत पुढे असले तरी…”, कसोटी मालिकेआधी बांगलादेशच्या कर्णधाराचं भारतीय संघाला आव्हान, नेमकं काय म्हणाला?

आजचा सामना अफगाणिस्तानसाठी खूप खास असणार आहे. कारण अफगाणिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याची अजून संधी आहे, जर संघ आज जिंकला तर ते उपांत्य फेरीच्या दिशेने मजबूत पाऊल टाकतील. दुसरीकडे, नेदरलँड्स देखील उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे, परंतु त्याला तेवढ्या संधी नाहीत. कारण नेदरलँड्सने फक्त २ सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत आता नेदरलँड्सचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरण्याचा प्रयत्न करेल.

हेही वाचा – IND vs SL, World Cup 2023: श्रेयस अय्यर झेलबाद होताच अथिया शेट्टी झाली नाराज, VIDEO होतोय व्हायरल

दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड –

वनडे क्रिकेटमध्‍ये आतापर्यंत या दोन्ही संघांमध्‍ये ९ सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये अफगाणिस्तानने ७ सामने आणि नेदरलँड्सने २ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील शेवटचा वनडे सामना जानेवारी २०२२ मध्ये खेळला गेला होता. याशिवाय हे दोन्ही संघ प्रथमच विश्वचषकात आमनेसामने आले आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना विश्वचषकात एकमेकांविरुद्ध विजय मिळवून शानदार सुरुवात करायची आहे.

दोन्ही संघांचे अव्वल खेळाडू –

अफगाणिस्तानच्या फलंदाजीत हशमतुल्ला शाहिदी आणि गुरबाज जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. ते संघासाठी सतत धावा करत आहेत. हशमतुल्ला शाहिदी हा २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. याशिवाय राशिद खानही शानदार गोलंदाजी करत आहे. या विश्वचषकात राशिदच्या नावावर आतापर्यंत ७ विकेट आहेत. जर नेदरलँड्सच्या खेळाडूंबद्दल बोलायचे तर, संघाचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स अप्रतिम फलंदाजी करत आहे. त्याने या विश्वचषकात आतापर्यंत २०४ धावा केल्या आहेत ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत, बास जे लीडे चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याच्या नावावर यापूर्वीच ११ विकेट्स आहेत.

हेही वाचा – “मी चौकार मारले बघितलं ना तरीही..”, श्रेयस अय्यर IND vs SL सामन्यानंतर भडकला; म्हणाला, “तुम्ही बाहेर..”

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, नूर अहमद

नेदरलँड्स (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), बास डी लीडे, साकिब झुल्फिकार, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन