Netherland vs Afghanistan ICC Cricket World Cup 2023 Match Updates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील ३४व्या सामन्यात अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स आमनेसामने आले आहेत. या दोन्ही संघांतील हा सामना लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४६.३ षटकांत सर्वबाद १७९ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तानसमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. संघाकडून सायब्रँड एंजेलब्रेक्टने सर्वाधिक ५८ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून नबीने ३ तर नूरने २ विकेट घेतल्या.
नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या नेदरलँड्सची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर वेस्ली बॅरेसीच्या (१) रूपाने संघाने पहिली विकेट गमावली. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी मॅक्स ओ’डॉड आणि कॉलिन अकरमन यांनी ६९ धावांची (६३ चेंडू) भागीदारी केली, जी डावातील सर्वात मोठी भागीदारी होती. ही भागीदारी १२व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ४० चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने ४२ धावा करून बाद झालेल्या मॅक्स ओ’डॉडच्या विकेटने मोडली.
त्यानंतर १९व्या षटकात कॉलिन अकरमन २९ धावा काढून बाद झाला. यानंतर पुढच्याच चेंडूवर कर्णधार स्कॉट एडवर्ड्स (०) पॅव्हेलियनमध्ये परतला. सलामीवीर मॅक्स ओ’डॉड, तिसऱ्या क्रमांकावर कॉलिन अकरमन आणि कर्णधार एडवर्ड्स धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. संघाच्या एकूण चार फलंदाजांनी धावबाद होऊन विकेट गमावल्या. काही वेळातच कर्णधार बास डी लीडे (३) २१व्या षटकात मोहम्मद नबीचा बळी ठरला. अशाप्रकारे संघाने ९७ धावांत ५ विकेट गमावल्या.
२६व्या षटकात साकिब झुल्फिकार ३ धावा करून नूर अहमदच्या जाळ्यात अडकला. यानंतर ३१व्या षटकात लोगान व्हॅन बीक २ धावांवर, चांगली खेळी खेळत असलेला सायब्रँड एंजेलब्रेक्ट ६ चौकारांच्या मदतीने ५८ धावांवर खेळत होता, ४२ व्या षटकात रोएलॉफ व्हॅन डर मर्वे ११ धावांवर खेळत होता. मात्र, त्यानंतर पॉल व्हॅन मीकरेन ४ धावांवर १० विकेट्सच्या रुपाने बाद झाला.
हेही वाचा – IND vs SL, World Cup 2023: ‘डीआरएस’वर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘येथून पुढे मी रिव्ह्यू…’
अफगाणिस्तानने गोलंदाजीत केली कमाल –
अफगाणिस्तानसाठी अनुभवी फिरकी गोलंदाज मोहम्मद नबीने ९.३ षटकात केवळ २८ धावा देत ३ विकेट घेतल्या. याशिवाय नूर अहमदने २ फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवले. तर मुजीब उर रहमानला १ विकेट घेतली.