Netherlands vs Sri Lanka ICC Cricket World Cup 2023 Match Updates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या १९ व्या सामन्यात श्रीलंकेने नेदरलँड्सचा ५ राखून पराभव केला. लखनऊच्या एकना स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सने २६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने पाच गडी गमावून २६३ धावा केल्या आणि स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. श्रीलंकेच्या विजयाचा हिरो सदिरा समरविक्रमा ठरला. सदीरा समरविक्रमाने १०७ चेंडूत ९१ धावा करून नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार मारले.

नेदरलँड्ससाठी आर्यन दत्त हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. आर्यन दत्तने १० षटकांत ४४ धावांत ३ गडी बाद केले. याशिवाय पॉल वॉन मीकेरेन आणि कॉलिन अकरमन यांना १-१ विकेट मिळाली. तत्पूर्वी, नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील श्रीलंका संघाचा हा पहिला विजय आहे. या विश्वचषकात आपला पहिला सामना जिंकणारा श्रीलंका हा शेवटचा संघ आहे. श्रीलंकेपूर्वी उर्वरित नऊ संघांनी किमान एक तरी सामना जिंकला होता. आता श्रीलंकेनेही एक सामना जिंकला आहे

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
India Beat Ireland by 305 Runs and Registers Biggest Margin Victory in Womens ODI Cricket INDW vs IREW
INDW vs IREW: ऐतिहासिक! भारताच्या महिला संघाने नोंदवला इतिहासातील सर्वात मोठा विजय, आयर्लंडचा उडवला धुव्वा
Kagiso Rabada create history first SA20 2025 Bowler to bowl 2 consecutive maiden overs in the powerplay
SA20 2025 : कगिसो रबाडाने घडवला इतिहास! अश्विन-चहलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज
Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
Vijay Hazare Trophy Maharashtra Haryana Karnataka and Vidarbha qualify for the semi finals 2024-25
Vijay Hazare Trophy : महाराष्ट्रासह ‘या’ चार संघांनी उपांत्य फेरीत मारली धडक! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
14-year old Ira Jadhav slams 346 in U19 cricket breaks Smriti Mandhanas record against Meghalaya
Ira Jadhav : १५७ चेंडू, ३४६ धावा आणि ४२ चौकार…इरा जाधवने स्मृती मानधनाला मागे टाकत झळकावले विक्रमी त्रिशतक

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सचा डाव ४९.४ षटकांत सर्वबाद २६२ धावांवर गडगडला. एकवेळ नेदरलँड्स संघाने ९१ धावांत ६ विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, यानंतर सायब्रँड एंजेलब्रेक्ट आणि लोगन व्हॅन बीक यांच्या १३५ धावांच्या भागीदारीने डच संघाला मजबूत स्थितीत आणले. विश्वचषकातील सातव्या विकेट्ससाठी ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. सायब्रँडने ८२ चेंडूंत चार चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ७० धावा केल्या, तर व्हॅन बीकने ७५ चेंडूंत एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ५९ धावा केल्या. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंका आणि कसून राजिताने प्रत्येकी चार गडी बाद केले.

हेही वाचा – IND vs NZ: हार्दिकनंतर ‘या’ खेळाडूच्या दुखापतीने वाढवली टीम इंडियाची डोकेदुखी, न्यूझीलंडविरुद्ध खेळणार की नाही? जाणून घ्या

प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघाची सुरुवात डळमळीत झाली. ५२ धावांवर कुसल परेरा आणि कुसल मेंडिसच्या रूपाने दोन मोठ्या विकेट पडल्या होत्या. मात्र, पथुम निसांकाने ५४ धावांची खेळी खेळली. यानंतर सदिरा समरविक्रमाने डावाची धुरा सांभाळत नाबाद ९१ धावा केल्या. चरित असलंकाने सदिराला साथ दिली आणि ४४ धावांची खेळी केली. शेवटी धनंजय डी सिल्वाने 30 धावा करत संघाचा विजय निश्चित केला. श्रीलंकेने २६३ धावांचे लक्ष्य ४८.२ षटकात ५गडी गमावून पूर्ण केले.

श्रीलंकेच्या विजयानंतर गुणतालिकेत किती बदल झाला?

नेदरलँड्सचा पराभव केल्यानंतर श्रीलंकेच्या संघाला एक स्थानाचा फायदा झाला आहे. वास्तविक, याआधी श्रीलंकेचा संघ पॉइंट टेबलमध्ये तळाच्या म्हणजे दहाव्या क्रमांकावर होता, मात्र या विजयानंतर तो नवव्या स्थानावर आला आहे. आता श्रीलंकेचे ४ सामन्यांतून २ गुण झाले आहेत. त्याचबरोबर नेदरलँड्स पॉइंट टेबलमध्ये आठव्या स्थानावर आहे. नेदरलँड्सचेही ४ सामन्यांत २ गुण आहेत. पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंड अव्वल स्थानावर कायम आहे. तर भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. भारत आणि न्यूझीलंडचे ४ सामन्यांत ८-८ गुण असले किवी संघाचे नेट रनरेट भारतापेक्षा सरस आहे. त्यामुळे ते अव्वल स्थानावर आहेत.

Story img Loader