भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या अनेक स्पर्धा खेळवल्या जात आहेत, ज्यामध्ये सिनियर महिला एकदिवसीय ट्रॉफीचाही समावेश आहे. या स्पर्धेत १८ वर्षांच्या मुलीने इतिहास लिहिला आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावणारी पहिला फलंदाज ठरली आहे. हा पराक्रम उत्तराखंड आणि नागालँड यांच्यात झालेल्या सामन्यात पाहायला मिळाला. यापूर्वी हा विक्रम श्वेता सेहरावतच्या नावावर होता. श्वेता सेहरावतने या वर्षाच्या सुरुवातीला द्विशतक झळकावले होते.

उत्तराखंडची क्रिकेटपटू नीलम भारद्वाजने भारतीय क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी ती सर्वात तरुण भारतीय महिला फलंदाज ठरली आहे. नागालँडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात तिने केवळ १३७ चेंडूत २०२ धावांची नाबाद खेळी केली. यादरम्यान नीलमने २७ चौकार आणि २ षटकार लगावले. नीलमने तिसऱ्या क्रमांकावर खेळताना ही ऐतिहासिक खेळी खेळली. १४७.४५ च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने तिने धावा केल्या. नीलम भारद्वाज ही भारतातील दुसरी खेळाडू आहे जिने लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – Pushpa 2: ‘पुष्पा २’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत भारताचा क्रिकेटपटू? व्हायरल फोटोंमागचं काय आहे सत्य?

नीलम भारद्वाजपूर्वी दिल्लीकडून खेळत असलेल्या श्वेता सेहरावतने जानेवारी २०२४ मध्ये नागालँडविरुद्ध द्विशतक झळकावले होते. त्यानंतर श्वेता सेहरावतने १५० चेंडूत २४२ धावांची खेळी केली होती. या ऐतिहासिक खेळीत तिने ३१ चौकार आणि ७ षटकार लगावले होते. श्वेता सेहरावतने वयाच्या १९व्या वर्षी हे द्विशतक झळकावले. मात्र काही महिन्यातच नीलम भारद्वाजने हा विक्रम मोडीत काढला आहे.

हेही वाचा – Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज

उत्तराखंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नीलम भारद्वाजच्या खेळीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारली. त्यांनी निर्धारित ५० षटकांत २ गडी गमावून ३७१ धावा केल्या. नीलमशिवाय नंदिनी कश्यपनेही शानदार खेळी केली, तिने ७९ चेंडूत ८१ धावा केल्या. त्याचवेळी कांचन परिहारनेही ५२ चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या. पण या मोठ्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना नागालँडचा संघ ४७ षटकांत सर्वबाद झाला. त्यांना केवळ ११२ धावा करता आल्या, त्यामुळे उत्तराखंडने हा सामना २५९ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.

Story img Loader