झ्युरिक : जागतिक  अजिंक्यपद स्पर्धेपाठोपाठ झ्युरिक येथे आज, गुरुवारी होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेत विजयी सातत्य कायम राखण्याचे भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राचे लक्ष्य असेल.नुकत्याच झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत नीरजने ८८.१७ मीटर भालाफेक करताना सुवर्णपदक पटकावले. जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सोनेरी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. तसेच ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा नीरज तिसराच भालाफेकपटू आहे. यापूर्वी विश्वविक्रमवीर चेक प्रजासत्ताकचा यान झेलेझ्नी आणि नॉर्वेच्या आंद्रेआस थॉर्किल्डसेन यांनीच अशी कामगिरी केली आहे.

हेही वाचा >>> R. Ashwin: आर. अश्विनचे पाकिस्तान संघाबाबत आश्चर्यचकित करणारे विधान; म्हणाला, “आशिया चषक आणि विश्वचषकात ते…”

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Who Is D Gukesh Indian Grandmaster Who Became Youngest Ever World Chess Champion
Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी
Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
World Championship Chess Tournament Dommaraju Gukesh defeats Ding Liren sport news
जगज्जेतेपदाच्या दिशेने गुकेशचे पाऊल; ११व्या डावात डिंगवर मात
U19 Asia Cup Final Bangladesh Beat India by 59 Runs And Successfully Defend the Title INDU19 vs BANU19
IND U19 vs BAN U19: बांगलादेशची पोरं हुशार; युवा भारतीय संघाला नमवत पटकावलं U19 आशिया कपचं जेतेपद

झेलेझ्नीने १९९२, १९९६ आणि २००० अशा सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. याच दरम्यान प्रत्येक ऑलिम्पिकपाठोपाठ झालेल्या जागतिक स्पर्धेतही (१९९३, १९९५, २००१) झेलेझ्नीने सुवर्ण कामगिरी केली होती. थॉर्किल्डसेन २००८ ऑलिम्पिक आणि २००९ जागतिक स्पर्धेचा विजेता होता.

भारताचा २५ वर्षीय नीरज यंदाच्या हंगामात अपराजित आहे. या वर्षी नीरजने दोहा आणि लोझान येथील डायमंड लीगच्या टप्प्यातही सुवर्णपदक मिळवले आहे. जागतिक स्पर्धेनंतर चार दिवसांतच नीरज झ्युरिक डायमंड लीगमध्ये सहभागी होत असून याकुब वाडलेज, ज्युलियन वेबर, अँडरसन पीटर्स हेच नीरजचे आव्हानवीर असतील. जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेता अर्शद नदीम या स्पर्धेत खेळणार नाही. डायमंड लीग मालिकेतील ही अखेरची स्पर्धा असून, त्यानंतर १६-१७ सप्टेंबर रोजी अमेरिकेत युजीन येथे अंतिम स्पर्धा होईल. अंतिम स्पर्धेत डायमंड लीगच्या साखळीतील पहिले सहा क्रमांकाचे खेळाडू खेळतील. गेल्या वर्षी विजेता ठरलेला नीरज झ्युरिक टप्प्यापर्यंत १६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर असून, वाडलेज (२१) आणि वेबर (१९) पहिल्या दोन स्थानांवर आहेत.

हेही वाचा >>> PAK vs NEP: अवघ्या २३.४ षटकात नेपाळचा खुर्दा; आशिया चषकात पाकिस्तानची विजयी सलामी, तब्बल २३८ धावांनी दणदणीत विजय

श्रीशंकरवरही लक्ष

याच स्पर्धेत भारताचा मुरली श्रीशंकरही लांब उडी क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहे. जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मुरलीला समाधानकारक कामगिरी करता आली नसली, तरी डायमंड लीगमध्ये लांब उडीच्या गुणतक्त्यात तो १० गुणांसह सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. जगज्जेता मिल्टिआदिस टेन्टोग्लू २१ गुणांसह आघाडीवर आहे.

Story img Loader