Neeraj Chopra Becomes World Number One Javelin Thrower : वर्ल्ड अॅथलेटिक्सनुसार जारी केलेल्या नवीन रॅंकिंगमध्ये ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत जगातील नंबर वन खेळाडू बनला आहे. नीरज चौप्राला पहिल्यांदाच हा किताब मिळाला असून त्याने पुन्हा एकदा देशाचं नाव उज्ज्व केलं आहे. नीरजने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिल्यांदा ट्रॅक अॅंड फिल्ड इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल (सुवर्ण पदक) जिंकण्याची कमाल केली होती. ताज्या रॅंकिंगच्या माहितीनुसार, नीरज चोप्राला १४५५ गुण मिळाले आहेत. जे आताचा वर्ल्ड चॅम्पियन एंडरसन पीटर्सच्या २२ अंकांनी जास्त आहेत. एंडरसनच्या नावावर सध्याच्या घडीला १४२२ गुण आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neeraj chopra becomes world number one javelin thrower once again proud moment for india nss