Neeraj Chopra Gold in World Championships: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने इतिहास रचला आहे. जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथील नॅशनल अ‍ॅथलेटिक्स सेंटरमध्ये झालेल्या भालाफेक स्पर्धेत नीरजने ८८.१७ मीटर भालाफेक करून सुवर्णपदकावर नाव कोरले. अंतिम फेरीत एकूण सहा अटेम्ट होते आणि नीरजने दुसऱ्या अटेम्टमध्येच ८८.१७ मीटर लाब भालाफेकत आघाडी घेतली. त्यानंतर त्याने गुणतालिकेत ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखली.

पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ८७.८२ मीटर फेक करून रौप्य पदक जिंकले. त्याचवेळी, झेक प्रजासत्ताकच्या जेकब वेडलेचने ८६.६७ मीटरची सर्वोत्तम थ्रो करून कांस्यपदक पटकावले. अंतिम फेरीत नीरजसोबत डीपी मनू आणि किशोर जेना हे दोन भारतीय खेळाडू होते. किशोरने ८४.७७ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह पाचव्या स्थानावर तर डीपी मनूने ८४.१४ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

Indian Hockey Team Wins Asian Champions Trophy Title 5th Time And beat China by 0 1
India vs China Hockey: भारतीय हॉकी संघाने घडवला इतिहास, चीनचा पराभव करत पटकावले आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं विक्रमी पाचवं जेतेपद
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Asian Champions Trophy 2024 IND vs JAP India Hocket Team beat Japan by 5 1 Score
Asian Champions trophy 2024: पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदकानंतर भारताच्या हॉकी संघाची विजयी घोडदौड सुरू, चीननंतर जपानचा ५-१ च्या फरकाने पराभव
Paris Paralympics 2024 India Medal Tally in Marathi
Paralympics 2024: ७ सुवर्ण, एकूण २९ पदकांसह पॅराखेळाडूंची पॅरिस मोहीम फत्ते
Paralympics 2024 Apan Tokito Oda win Gold medal
Paralympics 2024 : जपानच्या खेळाडूने व्हीलचेअर टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर केले अनोखे सेलिब्रेशन, VIDEO व्हायरल
Harvinder Singh First Gold Medal in Archery for India Dharambir Wins Gold and Pranav Surma Got Silver in Club Throw
Paris Paralympics 2024: २ सुवर्ण आणि २ रौप्य, भारताच्या पॅरा खेळाडूंनी पॅरिसमध्ये घडवला इतिहास, तिरंदाजीत पदकाला गवसणी
Paris Paralympics 2024 Medal Tally India Won 8 Medals on Day 5
Paris Paralympics 2024: भारताने पॅरालिम्पिकमध्ये एकाच दिवसात जिंकली तब्बल ८ पदकं, भालाफेक, बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदकं; भारत पदकतालिकेत कितव्या स्थानी?
Preethi Pal Becomes First Indian Woman Athlete who won 2 Medals in Paralympics
Paris Paralympics 2024: पॅरालिम्पिकमध्ये प्रीती पालने सलग दुसरे पदक जिंकत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली महिला भारतीय खेळाडू

नीरज, किशोर आणि मनूचे सहा प्रयत्न

पहिला प्रयत्न: पहिल्या फेरीत नीरजला फार काही करता आले नाही. त्याचा पहिलाच प्रयत्न फाऊल झाला. डीपी मनूने ७८.४४ मीटर अंतरावर भालाफेक केली आणि त्यानंतर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ७४.८० मीटर भालाफेक केली.

दुसरा प्रयत्न: नीरजने दुस-या फेरीत पुनरागमन केले आणि ८८.१७ मीटर थ्रो करून पहिले स्थान पटकावले. दुसऱ्या फेरीअखेर तो अव्वल स्थानावर आहे. किशोर जेनाने ८२.८२ मीटर अंतरावर भालाफेक केली. तो पाचव्या स्थानावर आहे. डीपी मनू ७८.४४ मीटर गुणांसह १०व्या क्रमांकावर आहे. अर्शद नदीम चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने दुसऱ्या फेरीत ८२.८१ मीटर फेक केली.

तिसरी फेरी: नीरजने तिसऱ्या फेरीत ८६.३२ मीटर अंतरावर भालाफेक केली. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने तिसऱ्या फेरीत ८७.८२ मीटर अंतर फेकले. भारताच्या डीपी मनूने ८३.७२ मीटरवर भालाफेक केली. तीन फेऱ्यांमधील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. तर, किशोर जेना तिसऱ्या फेरीत अपयशी ठरले. त्याच्या थ्रोला फाऊल म्हटले गेले.

चौथी फेरी: नीरजने चौथ्या फेरीत ८४.६४ मीटर फेक केली. डीपी मनूच्या थ्रोला फाऊल म्हटले गेले. किशोर जेनाने ८०.१९ मीटर फेक केली. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ८७.१५ मीटर अंतरावर भालाफेक केली. चार फेऱ्यांनंतर नीरज पहिला, अर्शद दुसरा आणि जर्मनीचा ज्युलियन वेबर तिसरा आहे. आता आणखी दोन फेऱ्या बाकी होत्या.

पाचवी फेरी: नीरजने पाचव्या फेरीत ८७.७३ मीटर अंतरावर भालाफेक केली. पाचव्या फेरीत किशोर जेनाच्या थ्रोला फाऊल म्हटले गेले. त्याचवेळी डीपी मनूने पाचव्या प्रयत्नात ८३.४८ मीटर भालाफेक केली.

सहावी फेरी: सहाव्या फेरीत नीरजने ८३.९८ मीटर फेक केला. त्याचवेळी किशोरचा सहावा प्रयत्न फाऊल झाला. डीपी मनूने ८४.१४ मीटरची थ्रो केली. अंतिम फेरीतील हा त्याचा आतापर्यंतचा सर्वोत्तम थ्रो ठरला. ६व्या प्रयत्नानंतर, नीरजने डीपी मनू आणि किशोर जेना यांना मिठी मारली आणि खूप आनंदी दिसला.

नीरज चोप्रा हा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय ठरला

१९८३ पासून सुरू असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये प्रथमच भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले आहे. एकंदरीत, जागतिक स्पर्धेत भारताचे हे तिसरे पदक आहे. गेल्या वर्षी नीरजने या चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले होते, तर लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने २० वर्षांपूर्वी २००३च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

हेही वाचा: Neeraj Chopra Wins Gold : सुवर्णपदक मिळाल्यानंतर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, “पदक जिंकणं म्हणजे…”

नीरज यापूर्वी २०२० मध्ये ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला होता. ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला पहिले सुवर्ण जिंकणारा नीरज चोप्रा ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियनशिप या दोन्हींमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. १९०० पासून झालेल्या ऑलिम्पिकमध्ये नीरजच्या सुवर्णखेरीज भारताला ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये कोणतेही पदक मिळालेले नाही.

नीरजच्या आधी, मिल्खा सिंग आणि पीटी उषा सारखे महान खेळाडू ऑलिम्पिक ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये पदक जिंकण्याच्या सर्वात जवळ आले होते, परंतु ते देखील ऑलिम्पिक पदक कमी फरकाने गमावले होते आणि चौथ्या स्थानावर होते. अखेर नीरज चोप्राने २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्ण जिंकून ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये पदक न मिळवण्याचा १२० वर्षांचा दुष्काळ संपवला.