Golden boy Neeraj Chopra : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज खेळाने सगळ्या भारतीयांची मनं जिंकली आहे. जागतिक भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने ८८.१७ मीटर भाला फेक करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. जागतिक भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरणारा नीरज चोप्रा हा पहिला भालाफेकपटू ठरला आहे. यानंतर नीरजने केलेल्या एका कृत्याममुळे भारतीयांच्या मनात नीरज विषयीचा अभिमान द्विगुणित झाला आहे.

नेमकं काय घडलं?

भालाफेक स्पर्धेत गोल्डन बॉय नीरज चोप्राची सही घेण्यासाठी त्याची एक हंगेरियन चाहती आली. तिने नीरजकडे भारतीय राष्ट्रध्वजावर सही मागितली. मात्र नीरजने भारतीय राष्ट्रध्वजावर सही देण्यास स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला. मात्र नीरजने तिला निराश केलं नाही. नीरजने या महिला चाहतीच्या टीशर्टच्या बाहीवर सही केली. नीरजने केलेली ही कृती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नीरजने केलेल्या कृतीची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली आहे. अनेकांनी नीरज आम्हाला तुझा अभिमान वाटतो असं म्हटलं आहे.

हे पण वाचा- Neeraj Chopra Wins Gold: सुवर्णपदक जिंकल्यानंतर ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची आई झाली भावूक; म्हणाली, “तो देशाचाच मुलगा…”

हंगेरीत सुरु असलेल्या जागतिक भालाफेक स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने नीरजच्या या कृत्याविषयी ट्विट करुन माहिती दिली. या पत्रकाराने ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की एक अतिशय सुंदर हंगेरियन महिलेला नीरज चोप्राची सही हवी होती. नीरजने सही द्यायला होकार दिला. महिलेने त्यानंतर राष्ट्रध्वजावर ऑटोग्राफ हवा आहे असं सांगितलं. मात्र नीरजने एका क्षणात तिला नकार दिला आणि त्याऐवजी तिच्या टीशर्टच्या बाहीवर सही केली. सारा तेंडुलकर फॅन क्लब या ट्विटर हँडलनेही हा फोटो ट्वीट केला आहे.

हे पण वाचा- नीरज चोप्रा व अर्शद नदीमने सुवर्ण व रौप्य पदकासह कमावलेली बक्षिसाची रक्कम माहित आहे का?

नीरज चोप्राने असा रचला इतिहास

नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या पुरुषांच्या भालाफेक अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकले. पात्रता फेरीच्या पहिल्या प्रयत्नात ८८.७७ मीटरचा त्याचा हंगामातील सर्वोत्तम थ्रो त्याला अंतिम फेरीत पोहोचण्यास मदत करण्यासाठी पुरेसा होता, त्यामुळे त्याला पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्येही स्थान मिळाले. रविवारी झालेल्या फायनलमध्ये, चोप्राच्या भालाफेकने भारताला चॅम्पियनशिपमधील पहिले पदक आणि स्पर्धेच्या इतिहासातील अभूतपूर्व सुवर्णपदक जिंकण्यात मदत करण्यासाठी ८८.१७ मीटर अंतरावर हा भाला त्याने फेकला.