Neeraj Chopra Diamond League Live Streaming: भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा आता ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावल्यानंतर मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याची नजर लौजाण डायमंड लीग जिंकण्यावर आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीम या स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. स्वित्झर्लंडमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत नीरज चोप्रा हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. नीरजला पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या अँडरसन पीटर्ससह अव्वल सहा भालाफेकपटूंपैकी पाच खेळाडूंचा सामना करावा लागेल. त्यात जेकब वडेलचचाही समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Video : रोहित शर्माला पाहताच उभा राहिला श्रेयस अय्यर! खुर्चीवरून उठला अन् केलं असं काही…; ‘त्या’ कृतीचं सर्वत्र होतंय कौतुक

यंदा झालेल्या दोहा डायमंड लीगमध्ये जॅकब वडेचने नीरजचा पराभव केला. नीरजला पॅरिस डायमंड लीग विजेता ज्युलियन वेबरचाही सामना करावा लागणार आहे. नीरज सध्या डायमंड लीग क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये ब्रुसेल्स येथे होणाऱ्या डायमंड लीग फायनलसाठी पात्र ठरण्यासाठी हे खेळाडू टॉप-६ मध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतील.

हेही वाचा – Rohit Sharma: ना बुमराह, ना कोहली, रोहितच्या मते ‘हे’ ३ दिग्गज टीम इंडियाचे आधारस्तंभ, T20 WC विजयाचं श्रेय देत म्हणाला…

डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राला खेळताना पाहण्यासाठी सर्वच चाहते उत्सुक आहेत. डायमंड लीग ही ऍथलेटिक्स कॅलेंडरमधील एक महत्त्वाची स्पर्धा आहे. या स्पर्धेचे लाइव्ह स्ट्रीमिंगमध्ये कोणत्या स्पोर्ट्स चॅनेलवर आणि कोणत्या अॅपवर पाहता येणार, जाणून घ्या.

नीरज चोप्राचा डायमंड लीगमधील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग (Lausanne Diamond League Live Streaming Details In Marathi)

लुझने डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राची स्पर्धा कधी असणार?
नीरज चोप्राचा डायमंड लीगमधील सामना शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी होणार आहे.

नीरज चोप्राची डायमंड लीगमधील स्पर्धा किती वाजता सुरू होईल?
नीरज चोप्राची लुसने डायमंड लीगमधील स्पर्धा २३ ऑगस्टला भारतीय वेळेनुसार रात्री १२:१२ वाजता सुरू होईल.

हेही वाचा – ICC Test Rankings: ICC ने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारताच्या खेळाडूंचा दबदबा, अश्विन-जडेजा पहिल्या स्थानी तर रोहित-विराट…

डायमंड लीग स्पर्धा कुठे होत आहे?
नीरज चोप्राची डायमंड लीगमधील स्पर्धा स्वित्झर्लंडमधील लौजाण या शहरात होणार आहे.

भारतातील कोणत्या टीव्ही चॅनेलवर नीरज चोप्राच्या स्पर्धेचे लाइव्ह टेलिकास्ट पाहायला मिळेल?
भारतातील डायमंड लीगमधील नीरज चोप्राची भालाफेक स्पर्धा स्पोर्ट्स१८ नेटवर्कवर लाइव्ह टेलिकास्ट केली जाईल.

डायमंड लीगमधील नीरज चोप्राच्या स्पर्धेचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?
डायमंड लीगमधील नीरज चोप्राच्या भालाफेक स्पर्धेचे भारतातील JioCinema ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neeraj chopra diamond league live streaming details when and where to watch live telecast of india golden boy match bdg