Neeraj Chopra Diamond League 2024 final: नीरज चोप्राने डायमंड लीगच्या अंतिम फेरीत दुसरे स्थान पटकावले आणि अंतिम फेरीत ८७.८६ मीटरचा सर्वोत्तम थ्रो केला. नीरज अवघ्या एक सेंटीमीटरने त्याचं जेतेपद हुकलं. ग्रेनेडाचा खेळाडूने नीरजसमोर बाजी मारली. ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स पहिल्या क्रमांकावर राहिला. त्याने ८७.८७ मीटर थ्रो केला. अँडरसनने २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. जिथे भारताच्या नीरजने रौप्यपदक जिंकले होते. पॅरिसमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीम डायमंड लीगच्या अंतिम फेरीत सहभागी झाला नव्हता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नीरज चोप्राचा तिसरा थ्रो

डायमंड लीगच्या अंतिम फेरीत एकूण ७ भालाफेकपटू सहभागी झाले होते. नीरज चोप्राने अंतिम फेरीत ८६.८२ मीटरचा पहिला थ्रो केला. यानंतर त्याने ८३.४९ मीटरचा दुसरा थ्रो केला. तिसऱ्या थ्रोमध्ये नीरजने पुनरागमन केले आणि त्याने ८७.८६ मीटरचा तिसरा थ्रो केला. या थ्रोमुळे नीरज दुसऱ्या स्थानावर पोहोचू शकला. यानंतर त्याचे दोन थ्रो ८५ मीटरपेक्षा कमी होते. नीरजने ८६.४६ मीटरचा शेवटचा थ्रो केला.

हेही वाचा – Yograj Singh: “माझ्या वडिलांनी वाघाची शिकार करून रक्त माझ्या ओठाला लावलं…”, युवीच्या बाबांनी सांगितला धक्कादायक किस्सा

डायमंड लीग फायनलमधील नीरज चोप्राचे ६ थ्रो

पहिला फेक- ८६.८२ मी
दुसरी थ्रो- ८३.४९ मी
तिसरी थ्रो- ८७.८६ मी
चौथा थ्रो- ८२.०४ मी
पाचवा थ्रो – ८३.३० मी
सहावी थ्रो- ८६.४६ मी

हेही वाचा – Tilak Verma Century: तिलक वर्माच्या शतकाचं आवेश खानने केलं सॅमी स्टाईल सेलिब्रेशन, सूर्यकुमार यादव पोस्ट करत म्हणाला “बेस्ट बर्थडे गिफ्ट…”

ब्रुसेल्स डायमंड लीग स्पर्धेत अँडरसन पीटर्स पहिला तर नीरज चोप्रा दुसरा राहिला. जर्मन स्टार ज्युलियन वेबरने ८५.९७ च्या सर्वोत्तम थ्रोसह तिसरे स्थान पटकावले. भालाफेकीत भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदकं जिंकणारा नीरज चोप्रा हा पहिला खेळाडू आहे. त्याने टोकियो २०२० मध्ये सुवर्ण पदक आणि पॅरिस २०२४ मध्ये रौप्य पदक जिंकले. याशिवाय त्याने डायमंड लीग २०२२ ही स्पर्धा जिंकली आहे. २०२३ मध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. डायमंड लीगमध्ये चॅम्पियन बनल्यास खेळाडूंना पदक मिळत नाही. तर विजेतेपद जिंकल्यावर, खेळाडूला जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी बक्षीस रक्कम आणि वाइल्ड कार्ड दिले जाते.

हेही वाचा – IND vs PAK Hockey: भारतीय हॉकी संघाचा पाकिस्तानवर विजय अन् सेमीफायनलमध्ये मारली धडक, कर्णधार हरमनप्रीत सिंहचे दोन दणदणीत गोल

अँडरसनने पहिल्यांदाच पटकावले डायमंड लीगचे जेतेपद

अँडरसन पीटर्सने प्रथमच डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले. गेल्या महिन्यात पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने कांस्यपदक जिंकले होते. पीटर्सने दोनवेळा वर्ल्ड चॅम्पियनशिपही जिंकली आहे. २०१९ आणि २०२२ मध्ये त्याने ही कामगिरी केली. याशिवाय राष्ट्रकुल स्पर्धेत एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले. ९३.०७ मीटर हा पीटर्सत्या कारकिर्दीतील सर्वोत्तम थ्रो आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neeraj chopra finishes 2nd in diamond league final misses title by just 0 01 m watch video bdg