Neeraj Chopra Flies To Germany After Paris Olympics 2024: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये नीरज चोप्रा रौप्य पदक पटकावले. टोकियो ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता यंदाही सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार होता. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये रात्री झालेल्या भालाफेकच्या अंतिम फेरीत अर्शद नदीमने ९२.९७ मीटर विक्रमी फेक करून सुवर्णपदक पटकावले, तर नीरजने रौप्यपदक पटकावले होते. अंतिम सामन्यानंतर नीरजने खुलासा केला की, तो मांडीच्या दुखापतीमुळे या सामन्यात त्रस्त होता आणि आता त्याच्यावर शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक संपताच नीरजने एक मोठा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – VIDEO: “माझी अशी इच्छा आहे की…” मनू भाकेरच्या आईने नीरजचा हात स्वत:च्या डोक्यावर ठेवला अन् चर्चांना आलं उधाण

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rohit Sharma to miss first Test against Australia Jasprit Bumrah to captain in Perth Devdutt Padikkal will be added in Team
IND vs AUS: रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून बाहेर, BCCIला दिली माहिती; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूला संघात स्थान मिळणार
IND vs AUS virat Kohli Is Emotional Said Glenn MacGrath Urges Australia to Go Hard on Him in Border Gavaskar Trophy
IND vs AUS: “विराट कोहली भावनिक आहे, त्याचा फायदा…”, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने कांगारू संघाला दिला मोलाचा सल्ला
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
german chancellor olaf scholz fires finance minister christian lindner
अन्वयार्थ : सुस्तीतून अस्थैर्याचे जर्मन प्रारूप!
Gautam Gambhir Backs KL Rahul With Big Statement Said How Many Teams Have a Player Like Him Border Gavaskar Trophy
Gautam Gambhir on KL Rahul: “केएल राहुलसारखे खेळाडू किती देशात आहेत?”, गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा जर्मनीला रवाना झाला आहे. रिपोर्टनुसार, शस्त्रक्रियेबाबत वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आणि आगामी डायमंड लीग स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा की नाही हे ठरवण्यासाठी तो जर्मनीला गेला आहे. ऑलिम्पिकपूर्वी नीरजला मांडीच्या आतील स्नायूंचा त्रास होत होता. सामन्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्याने खुलासा केला की, त्याच्या या दुखापतीवर शस्त्रक्रियेची गरज भासू शकते, म्हणून तो लवकरच डॉक्टरांकडे जाणार आहे. काही काळासाठी त्याला मैदानापासून दूर राहावे लागणार आहे. तो काही काळ कोणत्याही स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.

हेही वाचा – Vinesh Phogat: “तुमचा देश किती…”, विनेश फोगट प्रकरणावरून युनायटेड वर्ल्ड रेसलिंग प्रमुखांनी भारताला दाखवला आरसा? नेमकं काय म्हणाले?

Neeraj Chopra भारतात कधी परतणार?

पीटीआयच्या वृत्तानुसार, एका नीरजच्या कुटुंबाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, नीरज चोप्रा जर्मनीला रवाना झाला आहे. किमान महिनाभर तरी तो भारतात परतण्याची शक्यता नाही. पॅरिसमधील भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सूत्रांनीही चोप्रा जर्मनीला रवाना झाल्याचे सांगितले आहे. तो जर्मनीतील डॉक्टरांचा सल्ला घेईल. नीरजने यापूर्वी जूनमध्ये फिनलँडमध्ये झालेल्या पावो नुर्मी गेम्समधील विजयानंतर सांगितले होते की, दुखापतीचा सामना करण्यासाठी तो डॉक्टरांशी चर्चा करणार आहे.

हेही वाचा – Vinesh Phogat: विनेशने अंतिम सामन्यापूर्वी वजन वाढण्यामागे कोर्टात काय कारण सांगितलं? फोगटच्या वकिलांनी असा केला युक्तिवाद

नीरज चोप्राला हर्नियाच्या दुखापतीने त्रस्त आहे. ज्यामुळे त्याला ग्रोईनचा त्रास होत आहे. ऑलिम्पिक स्टारने पॅरिसमध्ये मांडीच्या समस्येने त्याला कसे अडथळा आणला याबद्दल सांगितले. नीरजने अंतिम फेरीतील पाचपैकी चार फाऊल थ्रो केले. ज्यामध्ये फक्त त्याचा दुसरा थ्रो त्याने 89.45 मी थ्रो केला आणि एकाच थ्रोवर रौप्यपदक पटकावले. त्याला रनअप घेतानाही त्रास होत होता. नीरजने २०२२ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ग्रोईनच्या (मांडीला दुखापत) दुखापतीबद्दल पहिल्यांदा खुलासा केला होता. तेव्हापासून त्याला त्याच्या मांडीच्या दुखापतीची समस्या होती. पण पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीसाठी आणि गेम्ससाठी त्याने या दुखापतीवर फारसे लक्ष दिले नाही.