Love Story of Neeraj Chopra and Himani Mor: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने अचानक लग्नाचे फोटो शेअर करत सर्वांनाच धक्का दिला. नीरज चोप्रा आणि टेनिसपटू जी आता स्पोर्ट्स मॅनेजर, हिमानी मोर हिच्याबरोबर खाजगी समारंभात विवाह केला. नीरज चोप्रा आणि हिमानी यांचं लग्न १६ जानेवारीला हिमाचल प्रदेश येथील शिमलामध्ये झालं. यानंतर नीरजने १९ जानेवारीला रात्री फोटो शेअर करत माहिती दिली.
नीरज चोप्राने कायमचं आपलं खाजगी आयुष्य मीडिया आणि स्पॉटलाईटपासून दूर ठेवलं. यासह त्याने आपल्या लग्नाची बातमीदेखील यशस्वीपणे मीडियापासून दूर ठेवत अचानक पोस्ट शेअर करत सर्वांना सरप्राईज दिलं. नीरजच्या अनेक जवळच्या मित्रांना त्याच्या व्हायरल झालेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे त्याच्या लग्नाबाबत माहिती मिळाली.
हेही वाचा – Neeraj Chopra Wife: कोण आहे नीरज चोप्राची पत्नी? टेनिसपटू आणि आता आहे मॅनेजर; अमेरिकेत घेतेय शिक्षण
नीरज आणि हिमानीची पहिली भेट कुठे झाली?
नीरज चोप्राचे काका सुरेंद्र चोप्रा यांनी आजतकला दिलेल्या मुलाखतीत नीरज आणि हिमानीच्या लव्हस्टोरीबाबत सांगितले. हिमानी आणि नीरज आधी अमेरिकेत भेटले आणि त्यानंतर ते दोघेही प्रेमात पडले. दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या नात्याला मान्यता दिली आणि २ महिन्यांपूर्वीच त्यांच्या लग्नाची बोलणी झाली.
नीरज चोप्राने लग्नासाठी कोणताही हुंडा घेतला नसल्याचे त्याच्या काकांनी सांगितले. याशिवाय नीरजने मुलीच्या कुटुंबाकडून शगुन म्हणून एक रूपया घेतला. नीरजने ३ दिवसांच्या लग्नसोहळ्याचे आयोजन केले होते, ज्याचे सर्व कार्यक्रम १४ जानेवारी ते १६ जानेवारीदरम्यान पार पडले. ज्या भटजींनी नीरज चोप्राच्या लग्नाचे विधी केले त्यांनाही आमंत्रित करताना नवरा मुलगा नीरज चोप्रा आहे याची माहिती दिली नव्हती.
लग्नापूर्वी हिमानी मोर ही नीरजच्या गावी गेली होती आणि तिथे लग्नापूर्वीच्या विधींसाठी १४ तास थांबली होती. विशेष म्हणजे, टोकियो ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक सुवर्णपदकानंतर दिग्गज ऑलिम्पियन अभिनव बिंद्राने त्याला भेट दिलेला नीरज चोप्राचा पाळीव कुत्रा, टोकियो, लग्नात पाहुणा म्हणून उपस्थित होता. गोपनीयता राखण्यासाठी, समारंभात पाहुण्यांना मोबाईल फोन वापरण्यास मनाई करण्यात आली होती.
नीरजचे काका सुरेंद्र यांनी सांगितले की, नीरजच्या ऑफ सीझनमध्ये म्हणजेच जेव्हा त्याचे काही सामने नसतील यादरम्यान त्यांचं लग्न प्लॅन केलं होतं. दोन्ही कुटुंबियांनी २०२८ मध्ये होणाऱ्या लॉस एंजिलिस ऑलिम्पिकपर्यंत अधिक २ वर्ष वाट पाहणं टाळण्यासाठी त्यांनी आताच त्यांच्या लग्नाचा घाट घातला. नीरज सप्टेंबरमध्ये झालेल्या डायमंड लीग फायनलमध्ये अखेरचा स्पर्धेत उतरला होता, जिथे त्याने दुसरे स्थान पटकावले होते.
हेही वाचा – LSG New Captain: लखनौकडून ऋषभ पंतचा राज्याभिषेक, संजीव गोयंकांनी केली मोठी घोषणा
नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकानंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावले. जे त्याचे सलग दुसरे ऑलम्पिक पदक होते. गेल्या काही वर्षांपासून नीरज परदेशात प्रशिक्षण घेत आहे. भारताच्या गोल्डन बॉयने अलीकडेच दिग्गज जॉन झेलेझनी यांची आगामी हंगामाच्या तयारीसाठी नवीन प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. नवीन हंगाम येत्या एप्रिलमध्ये सुरू होणार आहे.
हेही वाचा – Shreyas Iyer: श्रेयस अय्यर आणि KKR यांची का झाली ताटातूट? जेतेपद पटकावल्यानंतरही का केलं नाही रिटेन?
नीरजची पत्नी हिमानी मोर दिल्ली विद्यापीठातील मिरांडा हाऊसमधून पदवीधर आहे. तिने दक्षिण-पूर्व लुईझियाना विद्यापीठात क्रीडा व्यवस्थापनामध्ये पुढील शिक्षण घेतले आणि फ्रँकलिन पियर्स विद्यापीठातून स्पोर्ट्स आणि फिटनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये एमबीए केले. सध्या इसेनबर्ग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये मास्टर ऑफ सायन्सची पदवी घेत असलेली हिमानी मॅसॅच्युसेट्समधील ॲम्हर्स्ट कॉलेजमध्ये पदवीधर सहाय्यक म्हणूनही काम करते. ती संस्थेतील महिला टेनिस संघाचे व्यवस्थापन पाहते.