भुवनेश्वर : ऑलिम्पिक आणि जागतिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, तसेच किशोर जेना यांना फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेतील भालाफेक प्रकाराच्या थेट अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. अंतिम फेरीसाठी ७५ मीटर अंतराचा पात्रता निकष ठेवण्यात आला असून नीरज आणि किशोर यांनी कारकीर्दीत अनेकदा हे अंतर पार केले आहे. भालाफेकीची पात्रता फेरी मंगळवारी (आज), तर अंतिम फेरी बुधवारी होईल.

नीरजने नुकत्याच झालेल्या दोहा डायमंड लीगमध्ये सहभाग नोंदवला होता. यंदाच्या हंगामातील पहिलीच स्पर्धा खेळताना नीरजने ८८.३८ मीटर अंतरावर भाला फेकत दुसरा क्रमांक मिळवला होता. विजेत्या याकुब वाडलेजच्या अंतरापासून तो केवळ दोन सेंटीमीटर दूर राहिला होता. आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या किशोर जेनाचे डायलंड लीगमधील पदार्पण निराशाजनक ठरले होते. तिसऱ्या प्रयत्नानंतरच त्याचे आव्हान संपुष्टात आले. त्याला ७६.३१ मीटरचेच अंतर गाठता आले होते. आता फेडरेशन चषकात नीरजसमोर आव्हान उपस्थित करण्याचा किशोरचा प्रयत्न असेल.

indian wrestlers to play upcoming world championships
कुस्तीगिरांचा मार्ग मोकळा! जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सहभागास सरकारचा हिरवा कंदील
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Ranji Trophy 2024 -25 Mumbai beats Maharashtra by nine wickets
Ranji Trophy : मुंबईचा महाराष्ट्रावर दणदणीत विजय, ९ विकेट्सनी धूळ चारत नोंदवला हंगामातील पहिला विजय
Ranji Trophy Shreyas Iyer ends three year drought hit first class century 6000 runs complete
Ranji Trophy : श्रेयस अय्यरने संपवला ३ वर्षांचा दुष्काळ, रणजी ट्रॉफीत शतक झळकावत गाठला मोठा टप्पा
Denmark Open Badminton pv Sindhu loses in quarterfinals sport news
डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत हार
WI vs NZ 2nd Semi final New Zealand Women beat West Indies womens by 8 runs and enter final in Womens T20 World Cup 2024
WI vs NZ : न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत पटकावलं फायनलचं तिकीट, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार जेतेपदाची लढत
miss india 2024 is nikita porwal of madhya pradesh her biograbhy and age
Miss India चा खिताब जिंकणारी उज्जैनची निकिता पोरवाल आहे तरी कोण? अवघ्या १८ व्या वर्षी केलेली करिअरची सुरुवात, जाणून घ्या…
Loksatta explained Where exactly did the Indian women team go wrong How affected by the failure of Smriti Mandhana
जेतेपदाचे ध्येय, पण साखळीतच गारद! भारतीय महिला संघाचे नेमके चुकले कुठे? स्मृती मनधानाच्या अपयशाचा कितपत फटका?

हेही वाचा >>> IPL 2024 : ‘विराटला पुढील हंगामात कर्णधार बनवण्याचा विचार करावा…’, माजी खेळाडूचा आरसीबीला सल्ला

गेल्या वर्षीच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर राहिलेल्या डीपी मनूलाही फेडरेशन चषकाच्या थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे. या स्पर्धेत ८५.५० मीटरचे अंतर पार करत पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्याचा मनूचा प्रयत्न असेल. ‘‘ज्या भालाफेकपटूंनी कारकीर्दीत ७५ मीटरचे अंतर पार केले आहे, त्यांना फेडरेशन चषकात थेट अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. भालाफेकीसाठी नाव नोंदवलेल्यांपैकी नऊ जणांनी हे अंतर यापूर्वी पार केले असून यात नीरज आणि किशोर जेना यांचा समावेश आहे. ते थेट बुधवारी अंतिम फेरीत खेळतील,’’ असे भारतीय अॅथलेटिक्सचे मुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी सांगितले. पात्रता फेरीतील अव्वल तीन नेमबाज अंतिम फेरीत स्थान मिळवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.