Neeraj Chopra likely to go surgery for his hernia issue groin injury : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये रौप्य पदक जिंकले. ८ ऑगस्ट रोजी झालेल्या अंतिम सामन्यात नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८९.४५ मीटर भाला फेकला. पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक जिंकले. अर्शदने दुसऱ्या प्रयत्नात ९२.९७ भाला फेकत ऑलिम्पिक विक्रम केला.आता नीरज चोप्राबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. नीरज चोप्रा हर्नियाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी शस्त्रक्रिया करणार आहे. यामुळे नुकतेच त्याला कंबरेच्या भागात वेदना होत आहेत.

अव्वल तीन डॉक्टर नीरजवर शस्त्रक्रिया करू शकतात. मात्र, अंतिम निर्णय नीरजलाच घ्यायचा आहे. मांडीच्या समस्येमुळे नीरजने अलीकडच्या काळात फार कमी स्पर्धा खेळल्या आहेत. नीरज चोप्रानेही अंतिम सामन्यानंतर शस्त्रक्रियेचे संकेत दिले होते. चोप्रा फायनलनंतर म्हणाला, ‘मी माझ्या टीमशी बोलेन आणि त्यानुसार निर्णय घेईन. माझ्या शरीराची सध्याची स्थिती पाहता, मी तरीही खेळत आहे. माझ्यात अजून खूप काही शिल्लक आहे आणि त्यासाठी मला स्वतःला तंदुरुस्त ठेवायचे आहे.’

country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
unknown people beaten up doctor by saying not treating girl properly
ठाणे : मुलीवर व्यवस्थित उपचार केले नसल्याचे म्हणत डॉक्टरला मारहाण
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…

नीरज चोप्राच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल होणार –

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल होणार आहे. नीरज चोप्राचे सध्याचे प्रशिक्षक क्लाऊस बार्टोनिट्झ हे आता त्याच्यासोबत राहणार नाहीत. क्लाऊस वर्षातून काही महिने नीरजसोबत काम करायचे. नीरज आणि त्यांची टीम त्यांच्या बॅकरूम स्टाफला अपग्रेड करण्याचा विचार करत आहेत. क्लाऊस २०१८ पासून नीरजसोबत काम करत होते.

हेही वाचा – Vinesh Phogat Hearing in CAS: विनेश फोगटला रौप्य पदक देता येणं शक्य नाही? IOC प्रमुखांचा स्पष्ट नकार, म्हणाले…

नीरज चोप्राने टोकियोमध्ये सुवर्णपदक जिंकले होते –

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तो दिवस होता ७ ऑगस्ट २०२१. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने ८७.५८ मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले होते. पण आता नीरज गोल्डनला ८ ऑगस्टला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याने ८९.४५ मीटर भाला फेकत रौप्यपदकावर नाव कोरले. याआधी नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत पात्रतेच्या पहिल्याच प्रयत्नात ८९.३४ मीटर फेक करून अंतिम फेरी गाठली होती.

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 15 : अदिती आणि दीक्षाचा गोल्फचा सामना सुरु, विनेशच्या प्रकरणावर आज निर्णय येऊ शकतो

पॅरिसमध्ये भारताने आतापर्यंत ६ पदके जिंकली-

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने आतापर्यंत ६ पदके जिंकली आहेत. ज्यामध्ये पाच कांस्य आणि एक रौप्यपदक आहे. मनू भाकेरने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये प्रथम कांस्यपदक मिळवले. त्यानंतर मनू भाकरनेही मिश्र सांघिक स्पर्धेत सरबज्योत सिंगसह दुसरे कांस्य मिळवले. तसेच स्वप्नील कुसाळेने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत तिसरे कांस्यपदक जिंकले. त्यानंतर हॉकी संघाने कांस्यपदक तर नीरज चोप्राने रौप्यपदक पटकावले. यानंतर अमन सेहरातवने कुस्तीत कांस्यपदक जिंकले.

Story img Loader