Neeraj Chopra luxury house video viral : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी रौप्य पदक जिंकले. स्वातंत्र्यानंतर दोन पदके जिंकणारा नीरज हा देशातील पहिला खेळाडू आहे. यापूर्वी नीरजने टोकियोमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. ऑलिम्पिक चॅम्पियन झाल्यानंतर नीरजवर करोडो रुपयांचा वर्षाव झाला. या पैशातून नीरजने आपल्या गावात एक आलिशान घर बांधले आहे. हे घर एखाद्या अभिनेत्याच्या किंवा नेत्याच्या घरापेक्षा कमी सुंदर नाही. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नीरजच्या घरात दोन-दोन पार्किंग –

भारताचा गोल्डन बॉय नीरजच्या घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नीरजच्या घराबाहेरच्या नेमप्लेटवर ‘चोप्रा’ असे लिहिले आहे. त्यावर ‘वसुदेव कुंतबकम’ लिहिले आहे म्हणजे संपूर्ण जग एक कुटुंब आहे. घरात प्रवेश करताच पार्किंग आहे. या पार्किंगमध्ये अनेक आलिशान वाहने आहेत. त्यात महिंद्रा थार, रेंज रोव्हर, मस्टँग अशा गाड्या आहेत. थोडे पुढे गेल्यावर महागड्या बाइक्ससाठी स्वतंत्र पार्किंग आहे.

young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shocking accident a young man riding a scooter with his phone collided with a car video viral
VIDEO: असा भयंकर अपघात कधीच पाहिला नसेल! स्कूटर चालवता चालवता कारला आदळला अन्…, पुढे तरुणाबरोबर जे झालं ते पाहून उडेल थरकाप
Reason behind keeping name of bungalow asshare marketchi krupa in badlapur photo goes viral
आई-वडिलांची नाही तर ‘या’ गोष्टीची कृपा म्हणत पठ्ठ्यानं घराला दिलं भन्नाट नाव; PHOTO एकदा पाहाच
Kolhapur video Rankala Lake
“कोल्हापूरकरांसाठी सुखाचं एक ठिकाण म्हणजे…” कोल्हापूरातील लोकप्रिय ठिकाणचा VIDEO होतोय व्हायरल
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”

घराच्या अंगणात आहे मोठं मंदिर –

नीरज चोप्राच्या घराच्या अंगणात एक मोठे मंदिरही आहे. घरभर झाडे-झाडे आहेत आणि सगळीकडे हिरवळ आहे. घराच्या मागच्या बाजूला दिवाणखाना आहे. येथे वर डिझायनर दिवे बसवले आहेत. खाली पांढरे सोफे आहेत आणि त्याच्या शेजारी एक पूल टेबल देखील आहे. जमिनीवर हिरवे गवतही दिसते. नीरजच्या बहुमजली घराच्या वरती तिरंगा लावण्यात आला आहे.

हेही वाचा – ६,६,६,६,६…Kieron Pollard तात्यांचा कहर! राशिद खानच्या एकाच षटकात ठोकले तब्बल ‘इतके’ षटकार, VIDEO व्हायरल

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या नीरजने भालाफेकच्या अंतिम फेरीत ८९.४५ मीटर भालाफेक करून रौप्य पदक जिंकले होते. त्याचवेळी पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर थ्रो करून सुवर्णपदकावर कब्जा केला. १९९२ नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाले आहे. त्याचबरोबर भारताचा नीरज हा भारतीय ऑलिम्पिकच्या इतिहासात सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकण्याचा मान मिळवणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते.