Neeraj Chopra Marraige: भारताचा दिग्गज खेळाडू नीरज चोप्रा आता विवाहबंधनात अडकला आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरजने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली. नीरज चोप्राच्या लग्नाचे अचानक फोटो पाहताच सर्वांना सुखद धक्का बसला आहे. भारताचा स्टार ॲथलीट नीरज चोप्रा हा ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी भालाफेकीत दोन पदकं जिंकणारा पहिला खेळाडू आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुवर्ण पदक आणि पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये रौप्य पदक जिंकलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नीरजने फोटो शेअर करत आपल्या पत्नीचे नाव हिमानी असल्याचे सांगितले. लग्नाच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये नीरज चोप्राने लिहिले की, “माझ्या कुटुंबासह आयुष्याचा नवा अध्यायाची सुरूवात केली. यानंतर त्याने लिहिले की, या क्षणाकरता आम्हाला एकत्र आणणाऱ्या प्रत्येक आशीर्वादासाठी मी कृतज्ञ आहे. यानंतर त्याने नीरज आणि हिमानी असे लिहून हार्ट इमोजी अॅड केला आहे. नीरजने आपल्या लग्नमंडपातील दोन फोटो आणि आईचा हळद लावतानाचा फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा –Kho Kho World Cup 2025: भारत खो-खो वर्ल्ड चॅम्पियन, महिला संघासह पुरूष संघाची सुवर्णपदकाला गवसणी

नीरज चोप्राने एका खाजगी समारंभात जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्याने लग्न पार पडलं. नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. तेव्हापासून या खेळाडूच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. जेव्हा जेव्हा नीरज कोणत्याही मुलाखतीचा भाग असायचा तेव्हा त्याला लग्नासंबंधी प्रश्न विचारले जायचे. पण नीरजने लग्नाबाबत नेहमीच मौन बाळगले. आता या खेळाडूने अचानक लग्न करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. पॅरिस ऑलिम्पिकनंतर मनू भाकेर आणि त्याच्या नात्याचीही चर्चा झाली, पण त्या फक्त अफवा असल्याचे दोन्ही खेळाडूंच्या घरच्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Wankhede Stadium 50th Anniversary: वानखेडेच्या पन्नाशीचा कार्यक्रम मुंबईत संपन्न, कार्यक्रमात काय काय घडलं? वाचा

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकले होते. त्याने ८९.४५ मीटर भालाफेक करत दुसरे स्थान पटकावलेय तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. अलीकडेच, नीरज चोप्राला २०२४ मध्ये ‘ट्रॅक अँड फील्ड न्यूज’ या अमेरिकन मासिकाने भालाफेकमधील जगातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून घोषित केले. तर नीरजने कॅलिफोर्निया-आधारित मासिकाच्या २०२४ रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.