पीटीआय, नवी दिल्ली

भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा मांडीच्या अंतर्गत स्नायूच्या दुखापतीतून आता बरा झाला असून, तो तयारीच्या अखेरच्या टप्प्यात असल्याचे नीरजचे वैयक्तिक प्रशिक्षक क्लॉस बार्टोनिएट्झ यांनी सांगितले. ‘‘टोक्योपाठोपाठ पॅरिसमध्ये देखिल नीरजकडे पदकाच्या अपेक्षेने बघितले जात आहे. यंदाच्या हंगामात नीरजच्या तंदुरुस्तीबाबत अनेक प्रश्न उपस्थित राहिले असले, तरी आता सर्व गोष्टी रुळावर आल्या आहेत,’’ असे बार्टोनिएट्झ म्हणाले.

MS Dhoni new look photo viral
MS Dhoni : ‘तपकिरी केस, हिरवा चष्मा आणि हलकी दाढी’, माहीच्या नव्या लूकने चाहत्यांना लावले वेड, फोटो व्हायरल
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Hardik Pandya No look shot video viral during India vs Bangladesh 1st T20 Match
Hardik Pandya : हार्दिक पंड्याच्या No Look शॉटने चाहत्यांना लावलं वेड, VIDEO होतोय तुफान व्हायरल
explosion that caused injuries and destroyed vehicles at outside the Karachi airport, Pakistan,
Blast in Pakistan : हल्ला की अपघात? पाकिस्तानच्या कराचीतील स्फोटात चिनी कामगारांचा मृत्यू; चीनच्या निवेदनात रोख कोणावर?
Bengaluru Woman Wins Rs 9 Lakh Just By Sleeping
काय सांगता! फक्त झोपण्यासाठी बंगळुरूच्या तरुणीने जिंकले ९ लाख रुपये!
ENG vs AUS Liam Livingstone smashed 28 runs in a over of Mitchell Starc video viral
IPL मध्ये एका हंगामात २४ कोटी कमावणाऱ्या मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीच्या ठिकऱ्या; लिव्हिंगस्टोनने ६ चेंडूत चोपल्या २८ धावा
Task Fraud, Retired intelligence officer, Mumbai,
मुंबई : सेवानिवृत्त गुप्तवार्ता अधिकाऱ्याचे टास्कच्या नादात खाते रिकामे, तीन दिवसांत गमावले ११ लाख
Mercedes-Benz, Supriya Sule, Supriya Sule latest news,
मर्सिडिज बेंझला नोटीस देण्याच्या टायमिंगवर शंका; खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शासनाने…”

नीरजची तयारी आता अखेरच्या टप्प्यात आहे. तंदुरुस्ती देखिल समाधानकारक आहे. त्याच्या मांडीच्या स्नायूच्या दुखापतीची चिंता होती. पण, ती देखिल आता दूर झाली आहे. ऑलिम्पिकपर्यंत ती अशीच राहिल अशी आशा देखिल बार्टोनिट्झ यांनी व्यक्त केली. नीरज सध्या ऑलिम्पिकसाठी तुर्कीच्या अंताल्या येथे सराव करत आहे.

हेही वाचा >>>Tennis : लिएंडर पेस आणि विजय अमितराज आंतरराष्ट्रीय ‘टेनिस हॉल ऑफ फेम’मध्ये सामील होणारे पहिले आशियाई खेळाडू

‘‘ऑलिम्पिक स्पर्धा आता एका आठवड्यावर आली असून, तो सरावाच्या अखेरच्या टप्प्यावर आहे. सध्या तो फेकीचा सराव करत आहेत. नीरजने या वेळी स्पर्धेतील सहभागापेक्षा प्रशिक्षणावर अधिक भर दिला आहे. यासाठी तो पायांमधील ताकद वाढवण्यावर भर देत आहे. भालाफेकीसाठी वेगवान धावपट्टी आणि पायामधील ताकद भक्कम असणे आवश्यक असते. या दोन्ही गोष्टींमुळे अधिक उर्जा निर्माण होते आणि फेक चांगली होते,’’असे बार्टोनिएट्झ यांनी सांगितले.

मात्र, बार्टोनिएट्झ यांनी या वेळी पदकाची खात्री बाळगणे सध्या तरी उचित ठरणार नाही. बार्टोनिएट्झ म्हणाले,‘‘पदकाबाबत अंदाज व्यक्त करणे किंवा खात्री बाळगणे हे उचित नाही. प्रत्येक खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम तयारी करूनच सहभागी झालेला असतो. स्पर्धेच्या दिवशी कशी फेक होते त्यावर सगळे काही अवलंबून असते. पदकासाठी ८९ ते ९० मीटरची फेक खात्रीशीर आहे. पण, कधी-कधी ती त्यापेक्षा कमीही असू शकते. हे सर्व त्या वेळच्या परिस्थिती, वातावरण आणि खेळाडू दडपणाचा सामना कसा करता यावर अवलंबून असते.’’