Neeraj Chopra compete Diamond League Final with fractured hand: नीरज चोप्राचे डायमंड लीग २०२४ चे विजेतेपद फक्त एक सेंटीमीटरने हुकले. अंतिम फेरीत त्याने ८७.८६ मीटर सर्वोत्तम थ्रो केला आणि दुसरा क्रमांक पटकावला. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने पहिला क्रमांक पटकावला, त्याने ८७.८७ मीटरचा सर्वोत्तम थ्रो केला. नीरजचे चॅम्पियन होण्याचे स्वप्न थोड्या फरकाने भंगले. नीरजने २०२२ मध्ये डायमंड लीग फायनलचे विजेतेपद पटकावले आणि २०२३ मध्ये तो तिसऱ्या स्थानावर होता. आता त्याने जेतेपद न जिंकण्याचे मोठे कारण सांगितले आहे.

हेही वाचा – माजी भारतीय क्रिकेटपटूची अवघ्या महिनाभरात केनिया संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी, अंतर्गत वादाचा फटका

Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
How Divya Deshmukh Wins with Match Winning Move in Just 17 seconds left on clock in Chess Olympiad
Chess Olympiad 2024: १७ सेकंद शिल्लक असताना दिव्या देशमुखने कशी मारली बाजी? निसटलेल्या सामन्यात अनपेक्षित चाल खेळून मिळवला विजय
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Port Blair Centre renames amit shah
Port Blair : मोदी सरकारचा मोठा निर्णय; अंदमान-निकोबारच्या राजधानीचं नाव बदललं, पोर्ट ब्लेअर ‘या’ नावाने ओळखलं जाणार

डायमंड लीगचं जेतेपद कशामुळे हुकलं?

नीरज चोप्राने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “२०२४ चा सीझन संपला आहे. मी वर्षभरात शिकलेल्या सर्व गोष्टींकडे मागे वळून पाहतो. सुधारणा, अपयश, मानसिकता आणि बरेच काही याबद्दल. सोमवारी सरावाच्या वेळी माझ्या हाताला दुखापत झाली आणि माझ्या डाव्या हाताला चौथ्या मेटाकार्पलमध्ये फ्रॅक्चर झाल्याचे एक्स-रेमध्ये दिसून आले. या नव्या दुखापतीमुळे माझ्यासमोर वेगळे आव्हान उभे राहिले होते. मात्र, माझ्या चमूच्या मदतीमुळे आणि प्रोत्साहनामुळे हात फ्रॅक्चर असूनही मी अंतिम फेरीत सहभागी होऊ शकलो..”

हेही वाचा – Rohit Sharma: “रोहित तंत्रकुशल नाही, तो कठोर सरावही करत नाही”, जॉन्टी ऱ्होड्स रोहित शर्माबद्दल नेमकं काय म्हणाला? सचिनचा उल्लेख करत म्हणाला…

नीरज पुढे म्हणाला, “ही वर्षातील शेवटची स्पर्धा होती आणि मला माझा हंगाम चांगल्या ट्रॅकवर संपवायचा होता. जरी मी माझ्या अपेक्षेनुसार कामगिरी करू शकलो नाही, मला वाटते की हा एक असा हंगाम होता ज्यामध्ये मी खूप काही शिकलो. मी पूर्णपणे तंदुरुस्त होऊन पुनरागमन करण्यास तयार आहे. तुमच्या पाठिंब्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. २०२४ ने मला एक चांगला खेळाडू आणि व्यक्ती बनवले आहे. २०२५ मध्ये भेटू.”

हेही वाचा – Chess Olympiad 2024: १७ सेकंद शिल्लक असताना दिव्या देशमुखने कशी मारली बाजी? निसटलेल्या सामन्यात अनपेक्षित चाल खेळून मिळवला विजय

भारतासाठी भालाफेकमध्ये दोन ऑलिम्पिक पदकं जिंकणारा खेळाडू

नीरज चोप्राच्या या पोस्टवरून हे स्पष्ट होते की तो फ्रॅक्चर असलेल्या हाताने अंतिम फेरीत खेळला होता आणि दुखापतीमुळे तो आपली सर्वोत्तम कामगिरी करू शकला नाही. अंतिम फेरीत नीरजचे तीन थ्रो ८५ मीटरपेक्षा कमी होते. भालाफेकमध्ये दोन ऑलिम्पिक पदकं जिंकणारा चोप्रा हा पहिला भारतीय खेळाडू आहे. त्याने टोकियो २०२० मध्ये सुवर्ण पदक आणि पॅरिस २०२४ मध्ये रौप्य पदक जिंकले. नीरजने वर्ल्ड चॅम्पियननशिपचेही जेतेपद पटकावले आहे. त्याचा बेस्ट थ्रो ८९.९४ मी आहे.