Neeraj Chopra on Foul Throw in Javelin Final in Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास घडवला आहे. ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकणारा नीरज चोप्रा हा भारतातील पहिला खेळाडू ठरला आहे. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. यावेळीही नीरज चोप्राकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती, मात्र सुवर्णपदक जिंकण्यात तो हुकला आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पण या अंतिम फेरीत नीरजने ५ पैकी ४ फाऊल थ्रो केले. पण सलग फाऊल थ्रो का होत होते, यावर नीरजने उत्तर दिलं.

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 14: विनेश फोगटची सुनावणी पुढे ढकलली, किती वाजता सुरू होणार?

novak djokovic breaks roger federer record
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविचचे ऐतिहासिक यश ; फेडररला मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामन्यांत सहभाग
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Why Rohit Sharma Will Visit Pakistan Ahead of ICC Champions Trophy 2025 According To Reports
Champions Trophy: रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला का जावं लागणार? का सुरू आहे चर्चा? वाचा कारण
Indian captain Rohit Sharma attends Mumbai Ranji cricket team practice session sports news
रोहितची सरावास हजेरी; मुंबई रणजी संघाच्या वानखेडेवरील सत्रात रहाणेसह फलंदाजी
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?
Rohit Sharma Practice With Mumbai Ranji Trophy Team at Wankhede Stadium
Rohit Sharma: रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत, हिटमॅनने घेतला मोठा निर्णय; मुंबई संघासह…
South Africa announce Champions Trophy squad Temba Bavuma to Lead
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, एडन मारक्रम नाही तर ‘हा’ खेळाडू कर्णधार
ajith kumar team won dubai car race 2
सरावादरम्यान क्रॅश झाली होती कार, तरीही जिंकली दुबईतील स्पर्धा; ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारवर कौतुकाचा होतोय वर्षाव

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने पहिलाच अचूक थ्रो करत अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली होती. अंतिम सामन्यात नीरजने पहिला थ्रो केला पण हा थ्रो फाऊल ठरला. यानंतर, पुढच्या थ्रोमध्ये नीरज चोप्राने ८९.४५ मीटर हा आपल्या हंगामातील सर्वोत्तम थ्रो केला आणि दुसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले. नीरज चोप्राला अजूनही ३ संधी शिल्लक होत्या, जिथे तो आपली कामगिरी सुधारू शकला असता, परंतु नीरज चोप्राने त्यानंतरचे सर्व थ्रो फाऊल केले. मात्र, त्याचा दुसरा फेक इतका जबरदस्त होता की, त्याच थ्रोच्या जोरावर त्याने रौप्यपदक पटकावले.

हेही वाचा – Neeraj Chopra Won Silver: नीरज चोप्राची रौप्यपदकाला गवसणी, ऐतिहासिक थ्रो करत पॅरिसमध्ये भारताला मिळवून दिलं पाचवं पदक

रौप्यपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राने एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधताना तो म्हणाला की, जेव्हाही आम्ही देशासाठी पदक जिंकतो तेव्हा आपण सर्वजण आनंदी असतो. आता खेळ सुधारण्याची वेळ आली आहे. आम्ही बसून चर्चा करू आणि कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करू. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आम्ही चांगले खेळलो. स्पर्धा चांगली होती, पण प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा दिवस असतो, आज अर्शदचा दिवस होता. मी माझे सर्वोत्तम दिले, परंतु काही गोष्टींकडे लक्ष देणे आणि त्यावर काम करणे गरजेचं आहे. आपले राष्ट्रगीत आज वाजले नाही, पण भविष्यात ते कुठेतरी नक्कीच ऐकू येईल.

हेही वाचा – Arshad Nadeem New Olympic Record: पाकिस्तानच्या अर्शद नदीमचा ऑलिम्पिकमध्ये नवा रेकॉर्ड, तब्बल ९२.९७ मी लांब केला थ्रो

“माझ्या कामगिरीवर मी खूश नाही…” रौप्य पदक जिंकल्यावर नीरजचं मोठं वक्तव्य

अंतिम सामन्यात वारंवार झालेल्या फाऊलबाबत नीरज म्हणाला, ‘मी माझ्या कामगिरीवर खूश नाहीय आणि माझी टेक्निक आणि रनवेही चांगला नव्हता. फक्त एक थ्रो झाला, बाकीचे मी फाऊल केले. त्या दुसऱ्या थ्रोमध्ये, मला स्वतःवर विश्वास होता की मी सुद्धा एवढ्या लांब फेकू शकेन. पण भालाफेकमध्ये, जर तुमचा रनवे इतका चांगला नसेल तर भाला फार पुढे जाऊ शकणार नाही.’

अंतिम सामन्यात नीरज चोप्रा दुखापतीने त्रस्त होता. त्यानेच मॅचनंतर हे मान्य केले आणि सांगितले की, गेली २-३ वर्षे इतकी चांगली राहिलेली नाहीत. या काळात तो दुखापतीशी झगडत आहे. त्याने प्रयत्न केले पण अपयशी ठरले. आता तो त्याच्या दुखापतीवर आणि टेक्निकवर अधिक चांगले काम करेल.

Story img Loader