Neeraj Chopra Season Best Throw in Lausanne Diamond League 2024: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नंतर पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसला. यंदा झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून देणारा स्टार ॲथलीट नीरज चोप्रा आता एका नव्या अंदाजात दिसला आहे. नीरजने लौजाण डायमंड लीग २०२४ मध्ये चमकदार कामगिरी केली आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये केलेला त्याचा विक्रम मोडला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याने ८९.४५ मीटर भालाफेक करून रौप्यपदक जिंकले होते, परंतु दुखापतग्रस्त असतानाही डायमंड लीगमध्ये त्याने स्वत:चा विक्रम मोडला आहे.

हेही वाचा – Cristiano Ronaldo: फुटबॉलनंतर आता युट्युबवरही रोनाल्डोचा खास विक्रम, अवघ्या ९० मिनिटांत मिळवलं गोल्डन बटण

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Who Is D Gukesh Indian Grandmaster Who Became Youngest Ever World Chess Champion
Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी
Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Kalidas hirve , Vasai National Marathon Competition,
वसईत रंगली राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा, साताऱ्याचा कालिदास हिरवे विजेता
anmol kharb
अनमोल, सतीशसह अश्विनी-तनिषा अंतिम फेरीत

नीरज चोप्राचा सीझन बेस्ट थ्रो

नीरजने मोसमातील सर्वोत्तम थ्रो करत डायमंड लीग २०२४ मध्ये दुसरे स्थान मिळविले. नीरज चोप्राने ऑलिम्पिकचा विक्रम मोडत ८९.४९ मीटर भालाफेक केली, जो या हंगामातील त्याचा सर्वोत्तम थ्रो होता. नीरज चोप्राने डायमंड लीग २०२४ मध्ये सहाव्या प्रयत्नात आपला सर्वोत्तम थ्रो केला, परंतु तो ९० मीटरचा टप्पा गाठू शकला नाही आणि त्याचा वैयक्तिक विक्रमही तोडू शकला नाही. नीरज चोप्राच्या कारकिर्दीतील त्याचा सर्वोत्तम थ्रो ८९.९४ आहे. पण यावेळी त्याने पॅरिस ऑलिम्पिकमधील त्याचा विक्रम मोडला.

हेही वाचा – Rohit Sharma: ना बुमराह, ना कोहली, रोहितच्या मते ‘हे’ ३ दिग्गज टीम इंडियाचे आधारस्तंभ, T20 WC विजयाचं श्रेय देत म्हणाला…

भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी (तिसरा लेग) नीरजने दुसरे स्थान पटकावले, परंतु ग्रेनेडाच्या पीटर अँडरसनने ९०.६१ मीटर भालाफेक करून पहिले स्थान पटकावले. जर्मनीचा ज्युलियन वेबर ८७.०८ मीटर भालाफेक करत तिसरा राहिला.

नीरज चोप्रा सध्या दुखापतीने त्रस्त आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, पण तरीही त्याने या लीगमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दुखापतीचा परिणाम त्याच्यावरही दिसत होता. पात्रता फेरीत नीरज चोप्रा ४ प्रयत्नांत चौथ्या स्थानावर राहिला. पण नंतर चांगला कमबॅक करत त्याने दुसरे, तिसरे स्थान पटकावले. नीरजने ८९.४९ मीटरचा शेवटचा बेस्ट थ्रो केला.

हेही वाचा – Rohit Sharma: ना बुमराह, ना कोहली, रोहितच्या मते ‘हे’ ३ दिग्गज टीम इंडियाचे आधारस्तंभ, T20 WC विजयाचं श्रेय देत म्हणाला…

डायमंड लीग २०२४ मधील नीरज चोप्राचे थ्रो
पहिला फेक – ८२.१० मीटर
दुसरी थ्रो – ८३.२१ मीटर
तिसरा थ्रो – ८३.१३ मीटर
चौथा थ्रो – ८२.३४ मीटर
पाचवा थ्रो – ८५.५८ मीटर
सहावा थ्रो – ८९.४९ मीटर

नीरज चोप्राला ब्रुसेल्स, बेल्जियम येथे होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत खेळायचे आहे आणि त्यासाठी त्याला डायमंड लीगच्या चार लेग सामन्यांमध्ये चांगल्या कामगिरीच्या जोरावर गुणतालिकेत अव्वल-६ मध्ये स्थान मिळवावे लागेल. डायमंड लीगचे आतापर्यंत ३ फेऱ्या झाल्या आहेत आणि नीरज चोप्राने २ फे ऱ्यामध्ये १४ गुण मिळवले आहेत. पॅरिसमध्ये आयोजित दुसऱ्या फेरीत नीरजने भाग घेतला नव्हता. लौजाणनंतर आता अंतिम फेरीचा सामना ५ सप्टेंबर रोजी झुरिच येथे होणार आहे.

Story img Loader