नवी दिल्ली : ऑलिम्पिक विजेता आणि यंदाच्या हंगामात दुखापतीवर मात करून सातत्य राखणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा आगामी जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय संघाचे मुख्य आकर्षण असेल. जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी नीरजसह भारताचा २८ सदस्यीय संघ मंगळवारी जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने नाही, तर क्रीडा मंत्रालयाने भारतीय संघाची घोषणा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशियाई अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान उद्भवलेल्या दुखापतीमुळे गोळाफेक प्रकारातील आशियाई विक्रमवीर तजिंदरपाल सिंग तूरने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. जागतिक मैदानी स्पर्धा हंगेरीत बुडापेस्ट येथे १९ ते २७ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.

दुखापतीला मागे सारून नीरजने यंदाच्या हंगामात निवडक स्पर्धा खेळताना कामगिरीत सातत्य राखले आहे. ऑलिम्पिकनंतर झालेल्या गेल्या जागतिक स्पर्धेत नीरजला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. आता जागतिक स्पर्धेतील पदकाचा रंग सोनेरी करण्यासाठी नीरज निश्चित उत्सुक असेल.

संघ – ल्ल महिला : ज्योती याराजी (१०० मीटर अडथळा), पारुल चौधरी (३००० मीटर स्टीपलचेस), शैली सिंह (लांब उडी), अन्नू राणी (भालाफेक), भावना जाट (२० किमी चालणे). * पुरुष:  कृष्ण कुमार (८०० मी.), अजय कुमार सरोज (१५०० मी.), संतोष कुमार (४०० मीटर अडथळा), अविनाश साबळे (३००० मीटर स्टीपलचेस), सर्वेश कुशारे (उंच उडी), जेस्विन अल्ड्रिन (लांब उडी), मुरली श्रीशंकर (लांब उडी), प्रवीण चित्रवेल (तिहेरी उडी), अब्दुल्ला अबूबकर (तिहेरी उडी), एल्डोस पॉल (तिहेरी उडी), नीरज चोप्रा (भालाफेक), डीपी मनू (भालाफेक), किशोर कुमार जेना (भालाफेक), आकाशदीप सिंग, विकास सिंग, परमजीत सिंग (तिघेही २० किमी चालणे), राम बाबू (३५ किमी चालणे), अमोज जेकब, मोहम्मद अजमल, मोहम्मद अनस, राजेश रमेश, अनिल राजिलगम, मिजो चाको कुरियन (पुरुषांची ४ बाय ४०० मीटर रिले)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neeraj chopra to lead indian team at the world athletics event zws