Who Is Neeraj Chopra Wife Himani Mor: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने त्याच्या जीवनातील नव्या अध्यायाची सुरूवात केली आहे. नीरज चोप्रा खाजगी समारंभात लग्नबंधनात अडकला आहे, ज्याचे फोटो शेअर करत त्याने माहिती दिली आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरजने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली. त्याने फोटो शेअर करत आपल्या पत्नीचे नाव हिमानी असल्याचे सांगितले. पण नीरज चोप्राची पत्नी हिमानी नेमकी आहे तरी कोण, जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नीरज चोप्राच्या पत्नीचं नाव हिमानी मोर असं आहे. हिमानी मोर नीरज प्रमाणे हरियाणाची आहे. नीरज हा हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावचा रहिवासी आहे, तर हिमानी सोनीपत जिल्ह्यातील लाडसौली गावची आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हिमानीदेखील नीरजप्रमाणे क्रीडा क्षेत्रातील आहे.

हेही वाचा – Neeraj Chopra Wedding: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा अडकला विवाहबंधनात, फोटो केले शेअर; काय आहे पत्नीचं नाव?

स्पोर्टस्टारच्या वृत्तानुसार, हिमानी मोरेने साउथईस्टर्न लुईझियाना विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. ती एक टेनिसपटू आहे. तिने फ्रँकलिन पियर्स विद्यापीठात टेनिसमध्ये अर्धवेळ सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले. हिमानी एमहर्स्ट कॉलेजच्या महिला टेनिस संघाचे व्यवस्थापन करते. ती प्रशिक्षण, वेळापत्रक, भरती आणि बजेटिंगची देखरेख करते. मॅककॉर्मॅक इसेनबर्ग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून ती स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स ऑफ सायन्स करत आहे.

हेही वाचा –Kho Kho World Cup 2025: भारत खो-खो वर्ल्ड चॅम्पियन, महिला संघासह पुरूष संघाची सुवर्णपदकाला गवसणी

टेनिसपटू सुमित नागल यांच्याप्रमाणेच हरियाणातील लारसौली येथील रहिवासी असलेल्या हिमानीनेही तिचे प्राथमिक शिक्षण लिटल एंजल्स स्कूल, सोनीपत येथून केले. तिचा भाऊ हिमांशूही टेनिस खेळायचा.

हेही वाचा – Wankhede Stadium 50th Anniversary: वानखेडेच्या पन्नाशीचा कार्यक्रम मुंबईत संपन्न, कार्यक्रमात काय काय घडलं? वाचा

नीरज चोप्राचे काका भीम यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, नीरज आणि हिमानीने भारतात लग्न केले आणि ते हनीमूनला गेले आहेत. नीरजचे काका म्हणाले, “हो, दोन दिवसांपूर्वी त्यांचे भारतात लग्न झाले. लग्न कुठे झाले ते मी सांगू शकत नाही. मुलगी सोनीपतची असून ती अमेरिकेत शिकत आहे. ते हनिमूनसाठी देशाबाहेर गेले आहेत आणि ते कुठे जात आहेत हे मला माहीत नाही.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neeraj chopra wife who is himani mor tennis player neeraj weds himaniknow about her bdg