Neeraj Chopra Wins Doha Diamond league: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने नव्या मोसमाची शानदार सुरुवात केली आहे. नीरज चोप्राने ५ मे (शुक्रवार) रोजी दोहा डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले. दोहाच्या कतार स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या स्पर्धेत नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.६७ मीटर भालाफेकत डायमंड लीगवर आपले नाव कोरले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा चेक खेळाडू जेकोब वडलेच दुसऱ्या स्थानावर राहिला. एक महिन्यापूर्वी, तो लुझने येथे डायमंड लीग स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय ठरला होता. नीरजने गेल्या महिन्यात सांगितले होते की, या क्षणी त्याला शारीरिक आणि तांत्रिकदृष्ट्या बरे वाटत आहे, परंतु गेल्या वर्षी येथील अत्यंत खडतर स्पर्धा लक्षात घेता सीझन-ओपनिंग डायमंड लीगमध्ये सर्वोच्च पारितोषिक जिंकणे त्याच्यासाठी सोपे नव्हते.

नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग मीटमध्ये ८८.६७ मीटर फेक करून पुरुषांची भालाफेक स्पर्धा जिंकली. भारतीय खेळाडूने पहिल्याच थ्रोमध्ये सर्वोत्तम आकडा गाठला. यासह नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. नीरज चोप्राने ८८.६७ मीटर फेक करून पहिले, झेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेजने ८८.६३ मीटर फेकसह दुसरे, तर ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ८५.८८ मीटर फेकसह तिसरे स्थान पटकावले. गतविजेत्या नीरजने पहिल्या प्रयत्नात ८८.६७ मीटर भालाफेक करताना ग्रेनाडाचा पीटर अँडरसन व झेक प्रजासत्ताकचा व्हॅल्देच याकुब या कट्टर स्पर्धकांना मागे टाकले. दुसऱ्या प्रयत्नात मात्र नीरजचा भाला ८६.०४ मीटर लांब जाऊ शकला, परंतु तो अव्वल स्थानावरच होता. तिसऱ्या प्रयत्नात गोल्डन बॉय नीरज चोप्राचा भाला आणखी कमी दूर गेला अन् त्याला ८५.४७ मीटर पर्यंतच भालाफेकता आला. दुसऱ्या प्रयत्नात याकुब ८८.६३ मीटर भालाफेकून नीरजच्या जवळ पोहोचला होता. मात्र, अजूनही भारताचा नीरज चोप्रा हा वर्ल्ड लीडसह आघाडीवरच होता.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Who Is D Gukesh Indian Grandmaster Who Became Youngest Ever World Chess Champion
Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी
Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
U19 Asia Cup Final Bangladesh Beat India by 59 Runs And Successfully Defend the Title INDU19 vs BANU19
IND U19 vs BAN U19: बांगलादेशची पोरं हुशार; युवा भारतीय संघाला नमवत पटकावलं U19 आशिया कपचं जेतेपद
Kalidas hirve , Vasai National Marathon Competition,
वसईत रंगली राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा, साताऱ्याचा कालिदास हिरवे विजेता

डायमंड लीगची अंतिम फेरी यूजीनमध्ये होणार

दोहा येथे होणारी ही स्पर्धा डायमंड लीग मालिकेतील पहिला टप्पा आहे. १६ आणि १७ सप्टेंबर रोजी यूजीनमध्ये डायमंड लीग फायनलसह समारोप होणार आहे. डायमंड लीगच्या एका लेगमध्ये प्रत्येक खेळाडूला प्रथम क्रमांकासाठी ८, द्वितीय क्रमांकासाठी ७, तृतीय क्रमांकासाठी ६ आणि चौथ्या क्रमांकासाठी ५ गुण दिले जातात. भारतासाठी अ‍ॅथलेटिक्समध्ये पहिले ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणाऱ्या नीरजचे ९० मीटरचे अंतर पार करण्याचे उद्दिष्ट आहे. मोसमातील पहिल्या लढतीत तो अशी कामगिरी करतो की नाही हे पाहणे बाकी आहे. २०२२ कॉमनवेल्थ गेम्स ट्रिपल जंप चॅम्पियन एल्धोज पॉल देखील दोहा मीटमध्ये आव्हान देईल.

हेही वाचा: IPL 2023 RR vs GT: ट्रेंट बोल्टचा एकच षटकार अन् कॅमेरामन जखमी, सावरायला गेलेल्या राशिदची मनाला भावणारी कृती; Video व्हायरल

नीरज हा सध्याचा डायमंड लीग चॅम्पियन आहे

नीरज हा सध्याचा डायमंड लीग चॅम्पियन आहे. नीरजची वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरी ८९.९४ मीटर आहे, जो राष्ट्रीय विक्रमही आहे. २०१८ मध्ये दोहा डायमंड लीगमधील त्याच्या एकमेव सहभागामध्ये २०१८ मध्ये ८७.४३ मीटरसह चौथे स्थान मिळवले. ‘एकूण फिटनेस आणि ताकद’ नसल्यामुळे नीरज गेल्या वर्षी दोहा डायमंड लीगला मुकला होता. गेल्या सप्टेंबरमध्ये झुरिचमध्ये २०२२ ग्रँड फिनाले जिंकल्यानंतर डायमंड लीग चॅम्पियन बनणारा तो पहिला भारतीय ठरला. एक महिन्यापूर्वी, तो लुझने येथे डायमंड लीग स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय ठरला होता.

Story img Loader