भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चौप्राने एक नवा इतिहास रचला आहे. प्रतिष्ठित डायमंड ट्रॉफी जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. डायमंड लीगच्या पुरुष गटातील अंतिम फेरीत २४ वर्षीय नीरजने ८८.४४ मीटर भालाफेक करुन आपल्या कारकिर्दीतील नवा विजय नोंदवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्लेषण: भारतीय क्रिकेट संघासाठी आणखी एक निराशाजनक स्पर्धा… आणि अनेक अनुत्तरित प्रश्न!

चेक प्रजासत्ताकचा याकूब वाडलेज आणि जर्मनीच्या जुलियन वैब्बरला मागे टाकत नीरजने या ट्रॉफीला गवसणी घातली आहे. पहिल्या फेरीत नीरजला मागे टाकत याकूब वाडलेजने ८४.१५ मीटर भालाफेक करत आघाडी मिळवली होती. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नान नीरजने ८८.४४ मीटर भालाफेक करत स्पर्धेत पुनरागमन केले. तिसऱ्या फेरीत ८८ मीटर, चौथ्या फेरीत ८६. ११ मीटर, पाचव्या फेरीत ८७ मीटर आणि सहाव्या अंतिम फेरीत नीरजने ८३.६० मीटर अंतरावर भालाफेक करत विजय मिळवला. ८६.९४ मीटरच्या सर्वोच्च प्रयत्नासह वाडलेजने दुसरे स्थान पटकावले. स्वित्झर्लंडच्या झुरिचमध्ये ही डायमंड लीग पार पडली.

तब्बल १०१९ दिवस… इतका काळ लागला विराटला ‘हे’ साध्य करण्यासाठी

नीरजने २०२१ साली पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला होता. त्याआधी २०१८ मधील आशिया स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धेत नीरजने सुवर्णपदकाची कमाई केली होती. २०२२ जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये नीरजने रौप्य पदक मिळवले होते. या यशानंतर डायमंड लीग जिंकण्याची इच्छा नीरजने बोलून दाखवली होती. अथक प्रयत्नानंतर नीरजचे हे स्वप्न आज पूर्ण झाले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neeraj chopra won diamond league in mens javelin category rvs