Men’s Javelin Throw Final Neeraj Chopra Won Silver Medal in Olympic 2024: भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्यपदकाला गवसणी घालत भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील पाचवे पदक मिळवून दिले आहे. नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ८९.४५ थ्रो करत रौप्य पदक मिळवले आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारताचं हे पहिलं रौप्य पदक आहे. नीरज चोप्राचे अंतिम फेरीत पाचपैकी ४ थ्रो फाऊल गेले पण त्याने दुसऱ्याच थ्रोमध्ये ८९ मी चा टप्पा गाठला आणि अर्शद नदीम वगळता इतर कोणताही खेळाडू या क्रमांकापर्यंत पोहोचू शकला नाही. पाकिस्तानचा अर्शद नदीम प्रथम तर भारताचा नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी आला आहे. तर तिसरा क्रमांक ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ८८.५४ मीटरसह मिळवला.

Neeraj Chopraने घडवला इतिहास, ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

नीरजने यंदाच्या मोसमातील ८९.४५ हा सर्वाेत्कृष्ट थ्रो केला आहे. या सर्वाेत्कृष्ट थ्रोसह त्याने रौप्यपदकासह त्याचं दुसरं ऑलिम्पिक पदक मिळवलं आहे. अशाप्रकारे नीरज चोप्रा ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत दोन पदके जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. गेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने दुसऱ्या प्रयत्नात सर्वाधिक ८९.४५ मीटर भालाफेक केली, तर अर्शद नदीमने ९२.९७ मीटरसह ऑलिम्पिक विक्रम केला. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले होते, तर त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ८९.९४ मीटर आहे, जी त्याने २०२२ मध्ये स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये रौप्य पदक जिंकून मिळवली होती. मात्र दोन मीटर अधिक फेक करून त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Who Is D Gukesh Indian Grandmaster Who Became Youngest Ever World Chess Champion
Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी
Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Kalidas hirve , Vasai National Marathon Competition,
वसईत रंगली राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा, साताऱ्याचा कालिदास हिरवे विजेता

भालाफेकच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राची सुरूवात फारच निराशाजनक झाली. पण त्याने दुसऱ्याच प्रयत्नात ८९.४५ थ्रो करत दुसरे स्थान निश्चित केले. मात्र पुढील तिन्ही थ्रो नीरजचे फाऊल राहिले, त्यामुळे तो निराशही दिसत होता. पण त्याचा दुसरा थ्रो इतका कमाल होता की त्याने आपले दुसरे स्थान कायम ठेवले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या नीरजने भारतीयांच्या अपेक्षा कायम ठेवत भारतासाठी पदक जिंकलेच. तर पहिला क्रमांक पटकावत सुवर्णपदकाला गवसणी घातलेल्या अर्शदने या अंतिम फेरीतील दुसऱ्या प्रयत्नात तब्बल ९२.९७ मी. लांब भाला फेकत नवा ऑलिम्पिक विक्रम केला आहे. याआधी ९० मी. लांब भाला फेकण्याचा विक्रम होता. पण अरशदने हा विक्रम मोडला. आता तो अंतिम फेरीत पहिल्या स्थानी आला. तर नीरज चोप्राला मागे टाकले आहे. नीरज ८९.४५ मीटर फेक करून दुसरा आला आहे.

दोन पदके जिंकणारा चौथा भारतीय
नीरज चोप्रा भलेही सुवर्णपदक जिंकू शकला नसेल, पण असे असतानाही त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारा तो स्वातंत्र्यानंतरचा केवळ चौथा भारतीय खेळाडू ठरला. स्वातंत्र्यानंतर, फक्त बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (एक रौप्य आणि एक कांस्य), कुस्तीपटू सुशील कुमार (एक रौप्य आणि एक कांस्य) आणि नेमबाज मनू भाकेर (दोन कांस्य) यांनी भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत.

Story img Loader