Matthew Hayden’s World cup Team India: ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने २०२३च्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी आपल्या आवडत्या टीम इंडियाचा संघ निवडला आहे. काही स्टार खेळाडूंना स्थान न देता हेडनने आपल्या संघात काही आश्चर्यकारक नावे ठेवली आहेत. हेडनने आपल्या संघात इशान किशन आणि संजू सॅमसन या दोघांचा विकेटकीपिंग पर्याय म्हणून समावेश केला आहे. मात्र, कुलदीप आणि युजवेंद्र चहलला संघात स्थान दिलेले नाही.

हेडनने त्याचबरोबर त्याने निवडलेल्या या संघात स्पेशालिस्ट फिरकीपटू म्हणून रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांची निवड केली आहे. हेडनने के.एल. राहुलची स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून निवड केली आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या माजी स्टारने निवडलेल्या या संघात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या दोन्ही स्टार फिरकीपटूंना स्थान दिलेले नाही.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Former Mahayutti MLAs in Solapur compete for seat among five Legislative Council appointees
विधान परिषदेसाठी सोलापुरात, महायुतीच्या माजी आमदारांमध्ये स्पर्धा
Travis Head Statement on Mohammed Siraj Fight and Send Off Said I Said Well Bowled IND vs AUS 2nd Test
Travis Head on Siraj Fight: “मी म्हणालो चांगला चेंडू होता पण त्याने…”, सिराज आणि हेडमध्ये नेमका कशावरून झाला वाद? ट्रॅव्हिस हेडने सामन्यानंतर सांगितलं
Nagpur evm machines marathi news
ईव्हीएमविरुद्ध शंखनाद…मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी नागपुरात…
Travis Head Fastest Century in Day Night Test Match IND vs AUS Adelaide Test
Travis Head: ट्रॅव्हिस हेडचे डे-नाईट कसोटीत सर्वात जलद शतक, स्वत:चा रेकॉर्ड मोडत केली मोठी कामगिरी; भारत बॅकफूटवर

हेही वाचा: Asia Cup 2023: अजित आगरकरच्या “विराट सांभाळेल” विधानावर शादाब खानची खोचक प्रतिक्रिया; म्हणाला, “बोलून काही होत नाही…”

मॅथ्यू हेडनने २०२३ च्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या या १५ खेळाडूंची निवड केली आहे

मॅथ्यू हेडनने रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल आणि सूर्यकुमार यादव यांना मुख्य फलंदाज म्हणून निवडले आहे तर किशन आणि सॅमसन हे त्याच्या संघात यष्टिरक्षक म्हणून आहेत. दुसरीकडे, गोलंदाजीत हेडनने जडेजा आणि अक्षर यांना फिरकी गोलंदाज म्हणून तर मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि जसप्रीत बुमराह यांना वेगवान गोलंदाज म्हणून स्थान दिले आहे. हार्दिक पांड्याचा अष्टपैलू खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे जो संघाला आवश्यक असल्यास त्याच्या पूर्ण कोट्यातील षटके टाकण्यास सक्षम आहे.

याआधी हेडनने चहलची आशिया कप २०२३साठी टीम इंडियात निवड न करण्याबाबत आपले मत मांडले होते. हेडन पुढे म्हणाला होता की, “काही मोठी नावे अजूनही संघाबाहेर आहेत. विशेषत: चहल, तो इतका हुशार लेग-स्पिनर खेळाडू आहे की, त्यामुळे निवडकर्त्यांसाठी हे खूप कठीण असते. बीसीसीआयकडे चहल सारखा कुलदीप यादव हा आणखी एक खेळाडू आहे. तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्यामुळे त्यांनी तो पर्याय म्हणून निवडला आहे.”

हेही वाचा: World Athletics Championships: भारताने अ‍ॅथलेटिक्समध्ये रचला इतिहास; पुरुष संघ 4×400 रिलेमध्ये फायनलला पोहोचला, मोडला आशियाई विक्रम

टीम इंडिया ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापासून विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणार आहे. भारताचा बहुप्रतिक्षित सामना १४ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

आयसीसी विश्वचषक २०२३ साठी मॅथ्यू हेडनने निवडलेला भारताचा १५ सदस्यीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, के.एल. राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या , मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, इशान किशन आणि अक्षर पटेल.

Story img Loader