आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या क्रिकेट मालिकेतील पहिल्याच सामन्यात नेपाळने इतिहास रचला आहे. नेपाळने मंगोलियाविरुद्ध अवघ्या २० षटकात ३ गड्यांच्या बदल्यात तब्बल ३१४ धावांचा पर्वत उभा केला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील ही सर्वात्त मोठी धावसंख्या आहे. तसेच टी-२० सामन्यात पहिल्यांदाच एखाद्या संघाने ३०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. या सामन्यात नेपाळच्या फलंदाजांनी अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. नेपाळच्या फलंदाजांनी सर्वात वेगवान शतक, सर्वात वेगवान अर्धशतक, तसेच एकाच डावात २६ षटकार असे अनेक विक्रम रचले आहेत.

नेपाळचा आघाडीचा फलंदाज कुशल मल्ला याने टी-२० क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाची नोंद केली आहे. त्याने अवघ्या ३४ चेंडूत शतक ठोकलं. तसेच दीपेंद्र सिंह ऐरी याने सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. त्याने अवघ्या ९ चेंडूत अर्धशतक लागवलं. दीपेंद्रने पहिल्या ६ चेंडूत ६ षटकार ठोकले.

126 killed in earthquake in Tibet news
तिबेटमध्ये भूकंप, १२६ ठार,रिश्टर स्केलवर ६.८ तीव्रता; १८८ जण जखमी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Mohammed Kaif Statement India Defeat Said You will beat Pakistan in Champions Trophy and will act like we are the best
“पाकिस्तानवर विजय मिळवाल अन्…”, भारताच्या कसोटी मालिका पराभवावर माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाला सुनावलं
Earthquake of 7.1 Magnitude strikes Nepal
Nepal Earthquake Today : नेपाळ सीमेवर ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, आतापर्यंत ९५ मृत्यू; भारतातही जाणवले धक्के
Sachin Tendulkar Praised Rishabh Pant Fiery Inning in Sydney Test Said He has rattled Australia from ball one
IND vs AUS: सचिन तेंडुलकरही ऋषभ पंतची वादळी खेळी पाहून भारावला, कसोटीत टी-२० स्टाईल पाहून म्हणाला; “त्याने ऑस्ट्रेलियाला…”
Jasprit Bumrah stares down Sam Konstas After Usman Khwaja Wicket and Team India Aggressive Celebration Video viral
IND vs AUS: बुमराहचा जळता कटाक्ष अन् भारताचं आक्रमक सेलिब्रेशन! कॉन्स्टासने वाद घातल्यानंतर ख्वाजाच्या विकेटचा VIDEO व्हायरल
Criminal Killed As Gangs Clash In nagpur
नागपुरात टोळीयुद्ध पेटले, अंधाधुंद गोळीबारात कुख्यात गुंडाची हत्त्या
Kusal Parera T20I Century for Sri Lanka After 13 Years and Broke Tillakaratne Dilshan Record of Fastest Century NZ vs SL
NZ vs SL: ४४ चेंडूत शतक ! श्रीलंकेकडून टी-२०मध्ये १३ वर्षांत पहिल्यांदाच केलं शतक, कुशल परेराचा सर्वात जलद शतकाचा विक्रम

दीपेंद्र सिंह १० चेंडूत ५२ धावा करून नाबाद राहिला. या खेळीत त्याने ८ उत्तुंग षटकार लगावले. या वेगवान अर्धशतकासह दीपेंद्रने भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहचा सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. युवराज सिंह याने २००७ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरोधात १२ चेंडूत अर्धशतक फटकावलं होतं. या सामन्यात युवराजने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याच्या एका षटकात ६ षटकार लगावले होते.

हे ही वाचा >> Asian Games 2023 : ४१ वर्षांचा दुष्काळ मिटला, घोडेस्वारांच्या सुवर्णपदकासह भारताची पदकतालिकेत मोठी झेप

दरम्यान, या सामन्यात नेपाळने प्रथम फलंदाजी करताना ३१४ धावांचा पर्वत उभा केला आहे. या डावात नेपाळच्या फलंदाजांनी तब्बल २६ षटकार आणि १४ चौकारांचा पाऊस पाडला. केवळ चौकार-षटकारांच्या मदतीने नेपाळच्या फलंदाजांनी २१२ धावा फटकावल्या. कुशल मल्ला ५० चेंडूत १३७ धावा करून नाबाद राहिला. त्याने १२ चौकार आणि ८ षटकार ठोकले. त्याचा स्ट्राईक रेट तब्बल २३७ इतका होता. तर दीपेंद्र सिंह याने ५२० च्या स्ट्राईक रेटने ५२ धावा फटकावल्या.

Story img Loader