Nepal Bowler Yuvraj Khatri injured video viral in U-19 Asia Cup 2024 : क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा जेव्हा गोलंदाज विकेट घेतो, तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार राहत नाही. काही आक्रमक पद्धतीने मोठ्याने ओरडतात तर काही आपल्या साथीदारांसोबत साधेपणाने जल्लोष करतात, पण अलीकडच्या काळात जल्लोषाच्या शैलीत बदल झालेला दिसतो. अंडर १९ आशिया चषक स्पर्धेत नेपाळ आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यातही असेच काहीसे घडले. नेपाळचा फिरकीपटू युवराज खत्रीने विकेट घेतल्यानंतर जल्लोष करताना स्वत:लाच दुखापत करुन घेतली, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

नेपाळच्या गोलंदाजाला विकेटचं सेलिब्रेशन भोवलं –

वास्तविक, बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी करताना युवराज खत्रीने डावाच्या २८व्या षटकात लागोपाठ दोन चेंडूंत दोन विकेट्स घेत खळबळ उडवून दिली होती. युवराजने जेव्हा पहिली विकेट घेतली तेव्हा त्याने दक्षिण आफ्रिकेच्या तबरेझ शम्सीच्या स्टाईलमध्ये शूज काढून सेलिब्रेशन केले होते, मात्र दुसऱ्या विकेटनंतर युवराज इतका उत्तेजित झाला की त्याने वेगात धावताना त्याचा पाय मुरगळला. ज्यामुळे तो मैदानावर आडवा झाला. यानंतर त्याला चालताही येत नव्हते, म्हणून त्याच्या सहकारी खेळाडूने त्याला आपल्या पाठीवर बसवून मैदानातून बाहेर नेले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद; म्हणाले, “आमच्याकडे राजकारण…”
Yashasvi Jaiswal stuck at airport in Australia Rohit Sharma and Shubman Gill troll him watch video ahead IND vs AUS 2nd Test
IND vs AUS : यशस्वी जैस्वाल विमानतळावर अडकला काचेच्या दारात, रोहित-शुबमनने मदत करण्याऐवजी केली टिंगल, पाहा VIDEO
News About Sunil Pal
Sunil Pal : सुनील पाल बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यानंतर काही वेळातच पत्नी सरिताने दिली महत्त्वाची माहिती, “काही वेळापूर्वीच..”
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल

बांगलादेशचा नेपाळवर मोठा विजय –

सामन्यात बांगलादेश संघाने नेपाळचा सहज पराभव केला. या सामन्यात नेपाळ संघाने प्रथम फलंदाजी करताना ४५.४ षटकात १४१ धावा केल्या होत्या. नेपाळकडून आकाश त्रिपाठीने सर्वाधिक ४३ धावांची खेळी साकारली. त्याच्याशिवाय उत्तम मगर आणि अभिषेक तिवारी यांनी प्रत्येकी २९-२९ धावांचे योगदान दिले.

हेही वाचा – PV Sindhu Marriage : पी.व्ही. सिंधू लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत; जाणून घ्या कोणाशी आणि कधी करणार लग्न?

u

u

नेपाळने दिलेल्या केवळ १४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशी संघाची सुरुवात खूपच खराब झाली. अवघ्या १ धावांच्या स्कोअरवर संघाची पहिली विकेट गेली. मात्र, यानंतर जावाद अबरार आणि अझीझ उल हकीम यांनी दमदार अर्धशतके झळकावत १२८ चेंडू शिल्लक असताना संघाला सहज विजय मिळवून दिला.