Sandeep Lamichhane sentenced to 8 years : नेपाळचा क्रिकेटपटू संदीप लामिछानेच्या अडचणी वाढल्या आहेत. वास्तविक, बलात्कार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर संदीप लामिछाने याला ८ वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यामुळे संदीप लामिछानेला ८ वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. शिक्षेसोबतच संदीपला ३ लाख रुपये दंड आणि पीडितेला २लाख रुपये द्यावे लागणार आहेत. न्यायालयाचे माहिती अधिकारी चंद्र प्रसाद पंथी यांनी ही माहिती दिली. नेपाळ क्रिकेट संघाव्यतिरिक्त संदीप लामिछाने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केले आहे.
संदीप लामिछाने यांच्यावर काय आरोप?
बुधवारी नेपाळी न्यायालयाने संदीप लामिछाने याला शिक्षा सुनावली. अलीकडेच या क्रिकेटरवर बलात्काराचा आरोप झाला होता. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, शिशरराज ढकल यांच्या खंडपीठाने संदीप लामिछाने याला दोषी ठरवून ८ वर्षांची शिक्षा सुनावली. संदीप लामिछाने नेपाळ क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका अल्पवयीन मुलीने संदीप लामिछाने याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.
संदीप लामिछाने नेपाळमधील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक आहे. याशिवाय आयपीएलमध्ये खेळणारा संदीप लामिछाने हा पहिला नेपाळी क्रिकेटपटू आहे. संदीप लामिछाने आयपीएल २०१८ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला. त्याच वेळी, ऑक्टोबर २०२२ मध्ये संदीप लामिछाने याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. संदीप लामिछाने याच्यावर काठमांडूतील एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
हेही वाचा – हार्दिक पंड्याने जिममध्ये वर्कआऊट करतानाचा VIDEO केला शेअर; म्हणाला, ‘उष्णता…’
यानंतर संदीप लामिछाने याला अटक करण्यात आली होती, मात्र गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कोर्टाकडून दिलासा मिळाला होता. संदीप लामिछाने जामिनावर बाहेर होता. गेल्या वर्षी १२ जानेवारी रोजी पाटण उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात संदीप लामिछाने याची २० लाख रुपयांच्या दंडासह जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता या क्रिकेटपटूला ८ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
नेपाळ पोलिसांनी इंटरपोलची घेतली होती मदत –
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका १७ वर्षीय तरुणीने संदीप लामिछानेविरोधात काठमांडू येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या मुलीने तिच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. हा आरोप करताना संदीप वेस्ट इंडिजमध्ये होता आणि कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (सीपीएल) जमैका तल्लावाहकडून खेळत होता. त्यानंतर अटक वॉरंट जारी होताच संदीपला तात्काळ देशात परतण्याचे आदेश देण्यात आले.
मात्र, वॉरंट बजावल्यानंतर संदीप लामिछाने फरार झाला होता, त्याचे लोकेशन मिळत नव्हते. यानंतर नेपाळ पोलिसांनी संदीपला अटक करण्यासाठी इंटरपोलची मदत घेतली. त्यानंतर इंटरपोलने संदीपविरोधात ‘डिफ्यूजन’ नोटीस जारी केली होती. काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर संदीप जेव्हा काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली.